Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाणी पिण्याची योग्य पध्दत

नियमित पाणी पिणे आरोग्यास फायदेशीर आहे. प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. पाणी पिण्याची योग्य पध्दत अवलंबली नाही तर ते आरोग्याला हानिकारक ठरु शकते. चला तर मग जाणून घेवूया...

पाणी पिण्याच्या योग्य पध्दती कोणत्या?



  1. दिवसाची सुरुवात पाण्याने - आपल्या दिवसाची सुरुवात पाणी पिऊन झाली पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर जितके जास्त पाणी प्याल तितके पाणी प्या. त्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने शरीर साफ राहते.
  2. घोट घोट पाणी प्या. - पाणी एकदम पिणे योग्य नाही. पाणी हळूहळू घोट घोट घेत पिणे योग्य आहे.
  3. जेवणानंतर १ तासाने - जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे याला आयुर्वेदात विष समजले आहे. त्यामूळे जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर कमीत कमी १ तासानंतर पाणी पिणे योग्य आहे. 

  4. बसून पाणी पिणे - कधीही उभ्याने पाणी पिऊ नका. उभे राहून पाणी पिल्याने गुडघ्यावर जोर पडतो. त्यामुळे अर्थराइटीस होण्याचा धोका जास्त असतो.
  5. जेवणानंतर गुळण्या करणे - जेवण केल्यानंतर तोंड व गळा साफ करणे आवश्यक असते. त्यासाठी गरम पाण्याने चूळ भरुन गुळण्या कराव्यात. 

  6. खूप थंड पाणी पिणे टाळा - फ्रिजमधील खूप थंड पाणी पिल्याने पचनशक्ती मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅसेस यासारखे आजार होतात. जास्त थंड पाणी पिण्याची सवय अतिशय हानिकारक आहे.
  7. धावल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळा - खेळून झाल्यावर किंवा जास्त धावल्यामुळे श्वसनक्रिया जोरात सुरु असते. अशातच पाणी पिल्याने ठसका लागून शकतो. पोट दुखू शकते. तसेच मेंदूला इजा होवू शकते. त्यामुळे थोडा आराम करुनच पाणी पिणे चांगले. 
  

 पाणी पिण्याच्या जशा पद्धती आहेत तसेच पाणी वेळेवर पिणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा.

चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?

Post a Comment

0 Comments

close