Maharashtra Board SSC-HSC Exam Date 2021
यंदा इयत्ता बारावीची परीक्षा ही 15 एप्रिलनंतर होईल, तर दहावीची परीक्षा ही येत्या 1 मेनंतर होऊ शकते, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांनी फेब्रुवारीत होणाऱ्या 12 वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत असल्याची माहिती दिली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी यंदा परीक्षा पुढे ढकलली जात आहे, त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Maharashtra Board SSC-HSC Exam Date 2021)


0 Comments