Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शैक्षणिक वर्ष समाप्तीची घोषणा करुन पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे परिपत्रक काढवे - आ. कपिल पाटील यांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र..

शैक्षणिक वर्ष संपलेले आहे. परंतु त्याची अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षणामध्ये संभ्रमावस्था आहे. ऑनलाईन शिक्षण पूर्ण झाले आहे. आता ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी, पालक व शिक्षक तिघेही कंटाळले आहेत. प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात पुढील कामकाजाच्या नियोजनाचे परिपत्रक काढले जाते. त्यानुसार राज्यभरात शैक्षणिक उपक्रम, परीक्षा व सुट्ट्या यांचे नियोजन केले जाते. या वर्षी चे नियोजन करुन परिपत्रक काढणे बाबत शिक्षण संचालकांना आदेश द्यावेत यासाठी आ. कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. 


WhatsApp स्वाध्याय सोडवा Offline... Offline PDF व उत्तरसूची डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 


मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात मा. आ. कपिल पाटील यांनी खालील मागण्या केल्या आहेत. 

  • शैक्षणिक वर्ष समाप्तीची घोषणा करणेबाबत परिपत्रक काढवे.
  • पुढील शेैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे परिपत्रक काढावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्याची तारीख कळविण्यात येईल. 
  • शाळासिद्धी व युडायसची माहीती भरण्याची मुदतवाढ देण्याबाबत परिपत्रक काढावे. 
  • कोविड19 मुळे बाधित झालेल्या शिक्षक- शिक्षकेतरांचा रजा कालावधी कर्तव्य कालावधी समजण्याबाबत परिपत्रक काढावे. 
आमदार कपिल पाटील यांनी मा. शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना लिहिलेले पत्र...


 

Post a Comment

1 Comments

close