Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

समग्र शिक्षा अंतर्गत STARS प्रकल्पाचे बॅंक खाते (SAMAGRA SHIKSHA STARS) बॅंक ऑफ बडोदा मध्ये काढणेबाबत

STARS Project means -Strengthening Teaching Learning and Results for States  समग्र शिक्षा अंतर्गत STARS प्रकल्पाचे बॅंक खाते (SAMAGRA SHIKSHA STARS) बॅंक ऑफ बडोदा मध्ये काढणेबाबत सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद्, मुंबई अंतर्गत STARS Project (Strengthening Teaching Learning and Results for States)  या केंद्र पुरस्कृत योजनेकरीता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयाने बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकेची निवड केलेली आहे. समग्र शिक्षा अंतर्गत STARS Project या Nodal Angency (SNA) चे SNA खाते बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयीकृत बँकेत उघडण्यात आलेले आहे. ( Account Name SAMAGRA SHIKSHA STARS आणि A/C No. (04050100019814) आपणांस कळविण्यात येते की आपल्या अधिनस्त सर्व जिल्हास्तर, तालुकास्तर, स्तरावर Implimenting Agencies(IA) चे SAMAGRA SHIKSHA STARS योजनेचे Zero Balance चे बँक ऑफ बडोदा या बँकेतच खाते उघडणे आवश्यक आहे. 

STARTS PROJECT विषयी जाणून घ्या. 

महाराष्ट्रासह 6 राज्यात राबविला जाणार STARTS PROJECT 


बँकेची शाखा कार्यालयाच्या जवळ नसल्यास बँक ऑफ बडोदाची जी शाखा लगत असेल त्या शाखेत बँक खाते उघडण्यात यावे याबाबत बँकेचे कर्मचारी आपल्याशी संपर्क साधतील. बैंक शाखांचे संबंधित कर्मचारी अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक आपणांस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. Zero Balance ची खाती उघडून ती PFMS प्रणालीशी संलग्न करुन अहवाल या कार्यालयास कळविण्यात यावा. बँक कर्मचाऱ्याबरोबर सतत पाठपुरावा करून सदर प्रक्रिया तात्काळ होणे आवश्यक आहे. असे राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments

close