Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना / पुनर्गठन करणेबाबत

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम २००९ अन्वये दर दोन वर्षांनी शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करणेत येते. 



कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमवर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम (२१) अन्वये व महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम २००९ मधील नियम (१३) अन्वये स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीस शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरु होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती.

शाळा व्यवस्थापन समिती मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रतिनिधित्व देणे बाबतचा शासन निर्णय पहा. 


Join WhatsApp group

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क व अधिनियम २००९ भाग ५ शाळा व्यवस्थापन समिती १३ कलम २१ च्या प्रयोजनार्थ शाळा व्यवस्थापन रचना व कार्य (१) मध्ये कायम विना अनुदानित शाळेव्यतिरिक्त प्रत्येक शाळेत, नविन विद्याविषयक वर्ग सुरु झाल्यांच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत, शाळेच्या क्षेत्र / हद्दीमध्ये एक शाळा व्यवस्थापन समिती घटित करण्यात येईल व ती प्रत्येक दोन वर्षांनी पुनर्घटित करण्यात येईल अशी तरतुद आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ सुरु झाल्यामुळे ज्या शाळांची व्यवस्थापन समितीची मुदत समाप्त झालेली आहे अशा सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थान समितीची पुनर्रचना करणेबाबतची कार्यवाही करणेबाबत अमरावती शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना कळविले आहे. 

अमरावती Download circular 1 - Click Here

रत्नागिरी Download Circular 2 - Click Here


शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना कशी करावी? रचना कोणती? 

Post a Comment

0 Comments

close