Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांना मिळणार शालेय व्यवस्थापन समितीमध्ये प्रतिनिधित्व...

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर अधिनियमातील कलम 21 अंतर्गत शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्याबाबत 6 मुद्दे दिलेले आहेत. यामध्ये शालेय व्यवस्थापन समितीची रचना कशी असावी याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. त्यानुसार 75% पालक व इतर 25% , 50% महिला, वर्गनिहाय प्रतिनिधित्व, जात / प्रवर्गनिहाय प्रतिनिधित्व, वाडी / प्रभाग निहाय प्रतिनिधित्व करणारे मुद्दे समाविष्ट आहेत. 


        आता नवीन शासन निर्णयानुसार 7 वा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये दिव्यांग मुलांच्या पालकांना शालेय व्यवस्थापन समिती मध्ये प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. ज्या शाळेत दिव्यांग मुले असतील त्या शाळेत दिव्यांग मुलांच्या पालकांना शालेय व्यवस्थापन समिती मध्ये प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. Click Here

Post a Comment

0 Comments

close