Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ. 1ली ते इ. 12वी पर्यंत चे वर्ग सोमवार पासून सुरु होणार. 24 जानेवारी पासून शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकाऱ्यांना... शासन निर्णय पहा.

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत त्या शाळा इयत्ता 1ली ते इ. 12वी चे शारीरिक वर्ग 24 जानेवारी सोमवार पासून सुरू करण्याबाबत शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी Twitter वरुन माहिती दिली आहे.






कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरु करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने राज्यातील इ.१ ली ते १२ वी च्या शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून दि. २४ जानेवारी २०२२ पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचे अधिकार महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण (दोन्ही मात्रा) झालेले असावे. शाळेतील १५ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण संबंधित शाळेत करणेबाबत सर्व शिक्षणाधिकारी यांनी स्थानिक प्राधिकान्यांशी संपर्क साधून नियोजन करावे.
वरीलप्रमाणे शाळा सुरु करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकान्वये दिलेल्या मागदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर मार्गदर्शक सुचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार कोविड- १९ संदर्भात संबंधित शाळांनी मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात.


दि. २४ जानेवारी, २०२२ पासून सुरु होत असलेल्या शाळांबाबत शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी नियमित शाळांना भेटी देऊन आढावा घेऊन आवश्यक तेथे मार्गदर्शन करावे व भेटीचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. विभागीय उपसंचालकांनी एकत्रित अहवाल शिक्षण संचालकांना सादर करावा.

शाळा सुरु करणे बाबत काय म्हणाल्या शिक्षणमंत्री?

ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत त्या शाळा इयत्ता 1ली ते इ. 12वी चे शारीरिक वर्ग पुन्हा सुरू शकतात आणि 24 जानेवारीपासून पूर्व-प्राथमिक वर्ग देखील सुरू करू शकतात. राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

Schools in areas where coronavirus cases are fewer can restart physical classes for Std 1st-12th and also start pre-primary classes from January 24 onwards. We are committed to safe resumption of schools in the state.

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.लसीकरण व कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळणे हेच कोरोनावर मात करण्याचे पर्याय आहे.त्यामुळे जे विद्यार्थी लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी कोविड -19 प्रतिबंधक लस त्वरित घ्यावी.असेही त्यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments

close