माझा आवडता सण - कोरोना याविषयावर निबंध
शिक्षक : मुलांनो , उद्या वर्गात येताना कोरोना वर निंबध लिहून आणा..
बंड्याने लिहिलेला निबंध
माझा आवडता सण - कोरोना
कोरोना हा एक नवीन सण असून तो २०२० सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.
चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा करतात. तसेच हा एकमेव असा सण आहे जो. 👩👩👧👧हिंदु, मुस्लिम 🧕👳♀️ख्रिश्चन, बौद्ध अश्या सर्व धर्मांतील लोक तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
ह्या सणात खूप सारे खाण्याचे 🍲🍩🥘🧀🥪🧆🌮फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून 🏡🏠घरात आनंदाने राहतात.
शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, ऑफिस सर्व बंद असतात. 📺 टीव्ही वर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
या सणात तोंडाला मास्क 😷😷 लावून आणि एकमेकांपासून लांब 👯♂️अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा🩳 आणि टी शर्ट👕 घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल📱📱 बघत बसतात.
पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो🏥🏥 हॉस्पिटल 🚑🚑मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते...
हा सण साजरा करताना जास्त उत्साह दाखवल्यास पोलीस काठीचा प्रसाद देतात..
(उद्या शाळेत बंड्याचा सत्कार शिक्षण अधिकारी करणार आहेत😂😂)
हास्यकल्लोळ, कोरोना जोक, शिक्षक विद्यार्थी जोक्स,
0 Comments