Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बाल आनंद मेळावा | जि. प. शाळा लांजा नं. 5 मध्ये उत्साहात साजरा | खाऊ गल्ली, मौज मजा, मस्ती, धमाल, गाणी, नृत्य, नक्कल, डायलॉग

आदर्श शाळा लांजा नं.5 मध्ये बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये फनी गेम्स, खाऊ गल्ली, सांस्कृतिक कार्यक्रम याद्वारे मौज - मजा, मस्ती, धमाल करण्यात आली. 

दि.11मार्च 2022 वार - शुक्रवार रोजी  जि. प. प्राथमिक शाळा लांजा नं. 5 या शाळेत बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला. 


गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मुलांच्या मनामध्ये जी अनामिक भीती तयार झाली आहे ती दूर करण्यासाठी, मुलांना एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच  मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता... या बालआनंद मेळाव्याचे उदघाटन लांजा नगरपंचायचे नगराध्यक्ष मा. मनोहरजी बाईत व शाळा व्यवस्थापन  समितीचे अध्यक्ष मा.गुरुप्रसाद देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले...

बालआनंद मेळाव्यात मुलासाठी वेगवेगळे फनी गेम्स, खाऊचे स्टॉल्स लावण्यात आले होते... सर्व मुले व शिक्षकांनी फनी गेम्सचा मनसोक्त आनंद लुटला. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नृत्य, डायलॉग्स, नक्कल यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.... सर्व मुलांनी नृत्याचा आनंद लुटला..... या बालआनंद मेळाव्यासाठी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व लांजा नं 5 शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. चव्हाण मॅडम व शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची काही क्षणचित्रे


खाऊचे स्टॉल










फनी गेम्स







नृत्य, नाट्य व डायलॉग



बालआनंद मेळावा उद्घाटन कार्यक्रम






Post a Comment

0 Comments

close