Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांना कॉपी पुरविल्या प्रकरणी शाळेची मान्यता व मंडळ सांकेतांक रद्द

दिनांक १५ मार्च २०२२ रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान कॉपी पुरविल्याचे निदर्शनास आल्याने औरंगाबाद येथील एका शाळेची मान्यता रद्द करणेबाबत कार्यवाही करण्यात येत  आहे. याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी विधानपरिषदेत माहिती दिली. 

दिनांक १५ मार्च २०२२ रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकाराबाबत दैनिक महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राने ऑनलाईन वृत्त प्रकाशित केले आहे. या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली असता, जयभद्रा बहुउद्देशिय शिक्षण संस्था, गिरनेर तांडा संचलित, लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निलजगांव, ता. पैठण जि. औरंगाबाद येथे दि. १५ मार्च, २०२२ रोजी इ. १० वीच्या मराठी विषयाच्या पेपरच्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक, सहशिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवित असल्याचे निदर्शनास आले असून, सदर प्रकरणी शाळेचा मंडळ संकेतांक व मंडळ मान्यता रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.  असेे गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल.

 वाचा - दहावी - बारावीच्या परीक्षेसाठी 75%च अभ्यासक्रम... कमी केलेला 25% अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


Post a Comment

0 Comments

close