मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वाचा वापर करुन त्यांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. दोन ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जीवनावर आधारित व त्यांच्या कार्यावर आधारित माहिती आज आपण प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी वकिली परीक्षा पास केली. पुढे वकिलीचा व्यवसाय काण्यासाठी ते अफ्रिकेत गेले. तेथे हिंदी लोकांवर होणारा अन्याय त्यांच्या निदर्शनास आला. त्यांना स्वत:लाही अनेक वाईट अनुभव आले. तेव्हा या अन्यायाविरुद्ध आपण लढले पाहिजे, असे मनात ठरवून त्यांनी अन्यायाविरुद्ध चळवळ सुरु केली.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली आणि भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.
आज आपण त्यांच्या जीवनावर आणि कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. प्रश्नमंजुषेच्या आधारे आपण महात्मा गांधीच्या कार्याविषयी जाणून घेणार आहोत. ही प्रश्नमंजुषा सोडल्यानंतर तुम्हाला आकर्षक असे प्रमाणपत्र त्वरित दिली जाईल.
लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्र लिंक - Click Here
यापूर्वीच्या प्रश्नमंजुषा व प्रमाणपत्र यासाठी येथे टच करा. - Click Here
राष्ट्रपिता महात्मा गांधी विशेष प्रश्नमंजुषा
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक - Click Here
Join WhatsApp Group
0 Comments