Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Google Search

'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' अंतर्गत महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' अंतर्गत महाराष्ट्रातील तीन विद्यालयांना केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार पटकाविला आहे. 

केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून देशातील सर्व शाळांसाठी  सन 2015-16 पासून स्वच्छ विद्यालय हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या निकषामध्ये 90 ते 100 टक्के गुण मिळविणाऱ्या शाळांना हिरवा रंग, पाच श्रेणी आणि अत्युत्कृष्ट असा शेरा दिला जाणार आहे. 

स्वच्छ विद्यालय पुरस्कार माहिती व रजिस्ट्रेशन साठी येथे टच करा. Click Here


केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारात महाराष्ट्रातील तीन शाळांनी बाजी मारली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जावळी  तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, याच जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल आणि रायगड जिल्ह्यातील खारघर येथील रामशेठ पब्लिक स्कूल या विद्यालयांना स्वच्छतेला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 


स्वच्छतेसाठी विद्यालयांसाठी ठरवून दिलेल्या विविध मानकांवर पात्र ठरलेल्या देशभरातील ३९ विद्यालयांना 'स्वच्छ विद्यालय पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हात धुण्यासाठी साबण, संचालन व देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविडच्या काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मूल्यांकन झाले. निवड झालेल्या विद्यालयांमध्ये २१ शाळा ग्रामीण भागातील तर १८ शाळा या शहरी भागातील आहेत. 

Post a Comment

0 Comments

close