Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वीर बाल दिवस | veer bal divas | 26 डिसेंबर रोजी साजरा करणेबाबत शासन परिपत्रक | वीर बाल दिवस निमित्ताने घ्यावयाचे उपक्रम

दहावे शिखगुरू श्री. गोविंदसिंह यांचे बलिदानीपुत्र श्री जोरावरसिंह व श्री. फतेसिंह यांचे ९ वर्ष आणि ६ वर्ष वयाचे असताना शिख संप्रदायाचा सन्मान, अस्मिता हेतू आणि रक्षणार्थ २५ डिसेंबर १७०५ रोजी या दोन वीरपुत्रांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या गौरवार्थ २६ डिसेंबर हा दिवस वीर बालदिवस म्हणून साजरा करावा असे भारत सरकारने निर्देशित केले आहे.




वीर बाल दिवस यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेणे बाबत - Click Here


वीर बाल दिवस उपक्रम विविध कार्यक्रमाच्या आधारे देशभरात एक आठवडाभर चालणार आहे. ज्याचा मुख्य कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर, २०२४ रोजी भारत सरकारचे माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर कार्यक्रम किशोरवयीन विद्यार्थ्यांचे मनोसंवर्धन करणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टीकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असणार आहे. 

दिनांक १६ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत शाळांमध्ये वीर बाल दिवस साजरा करण्यासाठी उपक्रमाची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांचेकडून पाठविण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणेः


वीर बाल दिवस 2024 साजरा करण्यासाठी घ्यावयाचे उपक्रम


१. वयोगटानुसार स्पर्धाः 

मूलभूत टप्पा (६-८ वर्षे) आणि प्राथमिक टप्पा (८-११ वर्षे):

चित्रकला, निबंध लेखन आणि कथाकथन विषयः

माझे भारतासाठी स्वप्न

मला काय आनंदित करते

मध्यम टप्पा (११-१४ वर्षे) आणि माध्यमिक टप्पा (१४-१८ वर्षे):

निबंध, कविता, वादविवाद आणि डिजिटल सादरीकरण 

विषयः

राष्ट्र निर्माणात मुलांची भूमिका 

विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन


२. पीएमआरबीपी पुरस्कार प्राप्तकर्त्यांचा संपर्कः शालेय परिपाठामध्ये किंवा विशेष सत्रांमध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्तकर्त्यांच्या प्रेरणादायी कथा सादर करणे. 

३. ऑनलाइन स्पर्धा: MyGov/MyBharat या पोर्टलवर कथाकथन, सर्जनशील लेखन, पोस्टर बनवणे आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धांमध्ये सहभाग घेणे.

त्यानुसार, २६ डिसेंबर २०२४ हा दिवस "वीर बाल दिवस" म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करणे तसेच सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात यावे. सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्यानंतर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, भारत सरकार यांनी दिलेल्या ट्रॅकरमध्ये त्याचा अहवाल भरण्यात यावा.

https://docs.google.com/spreadsheets/d/1iLGN2m09Htuez1RpCeDpRBBSF On4436a YUW4CYAKM/edit?usp=sharing सदर ट्रॅकरवर कार्यक्रमांच्या छोटे व्हिडिओ आणि उच्च-रिझोल्यूशन फोटोग्राफ अपलोड करण्यात यावेत. तसेच सदर उपक्रमासंदर्भात काही अडचण आल्यास राज्य नोडल अधिकारी श्री. अरुण जाधव, उपविभागप्रमुख, सामाजिक शास्र विभाग (मो.क्र. ९४२३५३७९२७) यांचेशी संपर्क करावा.


वीर बाल दिन 26 डिसेंबर 2024 रोजी साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


वीर बाल दिवस 2023 साजरा करण्यासाठी घ्यावयाचे उपक्रम


1. जनजागृती उपक्रम

2. साहित्यिक उपक्रम 

3. कला उपक्रम

4. साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठीचे उपक्रम


1. वीर बाल दिवस जनजागृती उपक्रम :

खालीलपैकी कोणत्याही एका उपक्रमाद्वारे साहिबजादा यांच्या बलिदान आणि साहसाबद्दल जागरूकता निर्माण करता येईल.

a) चार साहिबजादे या ॲनिमेटेड चित्रपटाचे प्रदर्शन भरवता येईल जो पंजाबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

(b) बलिदान, साहस, आदर आणि जबाबदारी या विषयांवर आधारित साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगता येईल. 

(c) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवांनाविषयीचे रजक कथांच्या पुस्तकांचे वाचन

(d) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्याबाबत अधिकची माहिती असणाऱ्या तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानमालेचे आयोजन करता येईल. 

(e) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणाऱ्या विशेष परिपाठाचे आयोजन करता येईल.


2. वीर बाल दिवस साहित्यिक उपक्रम:

विद्यार्थ्यांना साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या बलिदान आणि साहसाबद्दल जाणीव झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खालील कृती करण्यासाठी सांगता येईल. 

a) निबंध लेखन 

b) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांचे बलिदान, साहस आणि त्यांच्या जीवनपटावरून शिकलेली इतर मूल्ये याबाबत कवितांचे वाचन किंवा लेखन 

c) तत्सम साहसी कृत्ये यांच्याबाबत माहिती करून घेणे आणि त्याचे वर्गातील इतर विद्यार्थ्यांसमोर कथन करणे. 

d) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटातील मुख्य घटनांचा नकाशा तयार करणे.

e) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटातील मुख्य घटनांवर आधारित गोष्ट तयार करणे.

f) काल्पनिक पात्रावर आधारित ज्याने साहसी वृत्तीने सर्व आव्हाने आणि सकटाचा सामना केला आहे. त्याविषयक प्रेरित करणारी लघुकथा लिहिणे.

g) एका मिनिटाच्या भाषणाद्वारे साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे.

h) प्रेरणादायी शब्द खेळ खेळणे

i) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनपटावरून शिकलेली मूल्ये याबाबत माहिती घेऊन लिहिणे आणि ती मूल्ये त्यांच्या स्वतःच्या जीवनात अंगीकृत करण्याकरिता काय करता येईल ते लिहिणे.

j) विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात आलेल्या कठीण परिस्थितींचा त्यांनी कसा सामना केला? त्यातून यशस्वीरित्या बाहेर येण्यासाठी काय केले आणि तेच का केले याबाबत बोलणे किंवा लिहिणे. 

k) प्रश्नमंजुषाही घेता येईल.


3. वीर बाल दिवस कलाधारित उपक्रम

साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या संदर्भात जाणीव जागृती निर्माण मार्गदर्शन करावे. उत्तरदायी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी थैंक्यू कार्ड्स तयार करून भिंतीवर लटकवावेत. हे कार्डस् साहिबजादा झाली की, विद्यार्थ्यांसाठी कला आधारित उपक्रम आयोजित करण्यात पावेत यासाठी खालील प्रमाणे विद्यार्थ्यांना 

(a) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या बलिदानावर आधारित त्यांचे जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी त्यांना उद्देशून तयार केलेली असावीत.

(b) साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांना वचन देण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रॉमिस कार्ड तयार करावेत..

(C) नवीन वर्ष जवळ आल्याने साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या जीवनावर आधारित नवीन वर्षासाठी दिनदर्शिका तयार करावी.


4. साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांच्या व्यक्तिमत्वाचे गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठीचे उपक्रम :

साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांनी जुलुमजबरदस्तीच्या विरुद्ध दृढ आत्मविश्वास आणि साहस दाखवले होते. ते सर्व अडीअडचणींच्या विरुद्ध ठाम विश्वासाने बोलण्यास आणि त्याविरुद्ध उभे राहण्यास सक्षम होते. आपल्या मुलामध्ये देखील आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ज्यायोगे ते स्वतःला व्यक्त करू शकतील आणि इतर व्यक्ती / जनसमुदाय यांच्यासमोर उभे राहून त्यांना प्रश्न करू शकतील, निर्भयतेने बोलू शकतील याकरिता त्यांच्या आवडीच्या आणि त्यांना आत्मविश्वास देणाऱ्या कृती/गोष्टी करण्यासाठी प्रेरित करायला हवे, वरील गुणवैशिष्ट्याव्यतिरिक्त साहिबजादा जोरावर सिंग जी आणि साहिबजादा फतेह सिंग जी यांनी पालकांचा आदर करणे, आपल्या विश्वासावर ठाम असणे, धैर्यवान आणि निर्भय असणे या गुणवैशिष्ट्याचे प्रदर्शन केले. शाळा मुलांच्यासाठी इतर सहशालेय उपक्रमांबरोबर अशा उपक्रमांचा / कृतींचा समावेश करू शकते ज्यामुळे वरीलप्रमाणे गुणवैशिष्ट्य त्यांच्या अंगी रुजविता येतील.


वीर बाल दिवस 26 डिसेंबर रोजी साजरा करणेबाबत भारत सरकारचे राजपत्र डाउनलोड करा. Click Here



वीर बाल दिन 26 डिसेंबर 2024 रोजी साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक डाउनलोड करा. Click Here


26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस यांच्या जयंतीकरीता त्यांचे छायाचित्र शासकीय मुद्रणालयाकडून प्राप्त करुन घेण्याबाबत शासन परिपत्रक - Click Here

वीर बाल दिवस - 26 डिसेंबर
26 डिसेंबर - वीर बाल दिवस
26 December - Veer Bal Divas
Veer Bal Divas
Veer Bal Din
26 December - Veer Bal Din

veer bal diwas nibandh in marathi

वीर बाल दिवस निबंध मराठी

वीर बाल दिवस मराठी माहिती

veer bal diwas information in marathi

वीर बाल दिवस मराठी

veer bal diwas marathi

वीर बाल दिवस 26 डिसेंबर

26 डिसेंबर वीर बाल दिवस

Post a Comment

0 Comments

close