Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

Full Form of LCM and HCF and their Example | मसावि आणि लसावि म्हणजे काय? त्याची उदाहरणे पहा.

Full Form of LCM and HCF मसावि आणि लसावि म्हणजे काय? 


LCM - The full form of LCM in Maths is the Least common multiple. LCM is the smallest number which is divisible by two or more given numbers.

HCF - HCF stands for Highest Common Factor. The highest common factor is determined by identifying all common factors between two or more numbers. 


मसावि / HCF - महत्तम सामाईक विभाजक

दोन किंवा अधिक संख्यांच्या विभाजकापैकी जो सर्व संख्यांचा साधारण विभाजक असून सर्व विभाजकात मोठा असतो त्यास त्या संख्यांचा महत्तम सामाईक विभाजक म्हणजेच मसावि असे म्हणतात.

मसावि काढण्यासाठी दिलेल्या संख्याचे मूळ भाजक संख्या काढावी ,व त्यानंतर त्याच्या मधील सारख्या प्रमाणात येणाऱ्या मूळ संख्याचा गुणाकार म्हणजेच मसावि . (Prime Factor)
उदाहरणार्थ :
उदा. 12 व 18 चा मसावि = 6
मूळ संख्या काढण्यासाठी त्या संख्या ला संख्याच्या कसोट्या लावाव्या.
उदा. वरील
12 = 6 x 2
12=3 x 2 x 2
18 = 2×9
= 2×3 x 3
= 6

लसावि / LCM - लघुत्तम सामाईक विभाज्य

दिलेल्या दोन किंवा अधिक संख्यांनी लहानात लहान अशा ज्या संख्येला नि:शेष भाग जातो त्या संख्येला दिलेल्या संख्यांचा लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावि असे म्हणतात. 
लसावि (LCM)

लसावि म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या (LCM) दिलेल्या संख्यानी ज्या लहांनात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे त्यांचा ल.सा.वि. होय.

ल.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी मोठी संख्यांच असते.
लसावि काढण्यासाठी दिलेल्या संख्याचे मूळ भाजक संख्या काढावी ,व त्यानंतर त्याच्या मधील जास्तीत जास्त प्रमाणात येणाऱ्या मूळ संख्याचा गुणाकार म्हणजेच मसावि .
उदा. 12 व 18 चा ल.सा.वि. 36.
12 = 2×6 = 2×2×3
18 = 2×9 = 2×3×3
= 2×2×3×3 = 36

Post a Comment

0 Comments

close