Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

29 ऑगस्टच्या संपात जुनी पेंशन संघटना सहभागी होणार नाही.....

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) नाही तर 1982 व 1984 ची जुनीच पेन्शन योजना हिच 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांची मागणी... NPS मध्ये सुधारणा मागणी करणाऱ्या 29 ऑगस्टच्या संपात जुनी पेन्शन संघटना व पेंशन शिलेदार सहभागी होणार नाहीत.

29 ऑगस्ट च्या संपातील प्रमुख मागण्या वाचा - Click Here

कुटुंब निवृत्ती वेतन व सेवा उपदान मंजुरी बाबत शासन निर्णय - Click Here

मागील अनेक वर्षापासून आपण सर्व जुनी पेन्शन मागणीसाठी लढा देत आहोत. राज्य स्तरावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तर देश पातळीवर NMOPS या संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने करून जुनी पेन्शन हा विषय कर्मचाऱ्यासाठी किती जिव्हाळ्याचा आहे हे आपण शासनाला निदर्शनास आणून दिले आहे. आपण सर्वांनी दाखविलेल्या एकतेमुळे आणि निर्णायक लढ्यामुळे कुटुंब निवृत्ती वेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, मृत्यूनिसेवा उपदान आणि नव्याने केंद्र आणि राज्य सरकारणे जाहीर केलेली UPS योजना (NPS योजनेतील सुधारणा) असे लाभ लागू करण्यास आपण सर्वांनी शासनाला भाग पाडले आहे. त्यामुळे जुनी पेन्शनचा हा लढा आणखी संयम आणि आत्मविश्वाने अधिक तीव्र केल्यास 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना जश्याची तशी लागू केल्याशिवाय शासनाला पर्याय उरणार नाही, हे लक्षात ठेवायला हवे.

Unified pension scheme (UPS) draft - Click Here


दि. 29 ऑगस्ट 2024 पासून काही संघटनांनी सुधारित (NPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनाच्या मागणीसाठी बेमुदत संप करण्याचे नियोजित केले आहे. मात्र केंद्र सरकारने UPS आणि राज्यसरकार सुधारित (NPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे निश्चित केले आहे. कपातीवर आधारित पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांचा ठाम विरोध असतांना शासन आणि संपकरी संघटनानी NPS योजनेतील सुधारणा बळजबरीने कर्मचाऱ्यांवर लादत आहेत. त्यामुळे अश्या संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व कोणताही पेन्शन शिलेदार सहभागी होणार नाही. असे जाहीर करीत आहोत.


राज्यातील 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची मागणी सुधारित (NPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना नाही तर 1982 व 1984 ची जुनीच पेन्शन योजना आहे आणि ती पूर्ववत लागू होणारचं ; हा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे जुनी पेन्शन लागू झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.


!! एकच मिशन - जुनी पेन्शन !!

महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना




Post a Comment

0 Comments

close