केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) आयोजनाबाबत...
केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दि.०२/०२/२०२५ (रविवार) रोजी संपूर्ण राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) 2025 घेण्याचे नियोजित (संभाव्य) असलेबाबत कळविण्यात आले होते. तसेच संदर्भ क्र.२ नुसार संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले असल्याने सदर दिवशी इतर कोणत्याही परीक्षेचे आयोजन करण्यात येवू नये याबाबत शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत निर्देशित करण्यात आलेले आहे.
त्यानुसार पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा दि.०२/०२/२०२५ रोजी घेता येणे शक्य नसल्याने सदर परीक्षा केंद्रशासनाच्या निर्देशित दिनांकास घेणेबाबत संदर्भ क्र.३ नुसार विनंती करण्यात आली होती. त्यास अनुसरुन संदर्भ क्र.४ नुसार शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांचे दि.२८/०१/२०२५ रोजीच्या ईमेलद्वारे FLNAT 2025 चाचणी पुढे ढकलण्याबाबत मान्यता दिलेली आहे.
सदर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा मार्च २०२५ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेण्याबाबत केंद्रशासन निश्चित करेल त्या दिनांकास परीक्षा घेण्यात येईल व आपणास सुधारित दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.
0 Comments