अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्यावतीने देशभरातील सर्व शाळांमध्ये "हमारा विद्यालय, हमारा स्वाभिमान" हा संस्कारक्षम व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हमारा विद्यालय, हमारा स्वाभिमान या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्यधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. त्यामुळे महाराष्ट्रतील सर्व शाळांमध्ये (सर्व माध्यमांतून चालनाऱ्या) हा उपक्रम राबविण्याबाबत नमूद केले आहे.
सदर विषयी शासन पत्रातील निर्देशानुसार दिनांक ०१.०९.२०२५ रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "हमारा विद्यालय हमारा स्वाभिमान" हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरुन निर्गमित करण्यात याव्यात. तसेच ज्या जिल्ह्यांना दिनांक ०१.०९.२०२५ रोजी गौरी सणानिमित्त स्थानिक सुट्टी असेल, त्या जिल्हातील शाळांमध्ये सदर उपक्रम दि.०२.०९.२०२५ रोजी राबविण्याबाबत सूचित करण्यात यावे.
दि. ०२ सप्टेंबर २०२५ रोजी देशभरातील सर्व शाळांमध्ये 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थी- शिक्षक एकत्रितपणे शाळा व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक संकल्प करणार आहेत.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थी व शिक्षक एकत्रितपणे शाळेतील स्वच्छता, शिस्तबद्धता व हरितमय वातावरण, विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन रुजविणे, राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता व नागरी कर्तव्यांचे पालन, शाळेला केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम म्हणून न पाहता राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचे केंद्र म्हणून पाहणे, नैसर्गिक पर्यावरण व मूल्यांची जपणूक करणे, यासंबंधी प्रार्थनेच्या वेळी शिक्षक विद्यार्थी सामूहिक संकल्प करणार आहेत.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, राष्ट्रीयभाव, सामाजिक समरसता व शाळेतील साधन संपत्तीची काळजी घेणे, नागरी कर्तव्याचे पालन करणे हे मूल्याधिष्ठित जीवनविचार विकसित होतील. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये (सर्व माध्यमांतून चालणाऱ्या) हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्याची विनंती संदर्भाधीन पत्रान्वये करण्यात आली आहे.
दिनांक ०2 सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात येणार आहे.
शाळांमध्ये 'हमारा विद्यालय-हमारा स्वाभिमान' हा संस्कारक्षम उपक्रम राबविणेबाबत परिपत्रक - Click Here
0 Comments