Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निकाल इ.1ली ते इ.8वी - निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत....

निकाल इ.1ली ते इ.8वी - निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणून देणेबाबत शासन निर्णय



संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी जाहीर केली आहे. त्यापूर्वी दिनांक १ मे २०२६ रोजी निकाल जाहीर करावयाचा आहे.


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पुढीलप्रमाणे नमूद आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्टपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे -शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे.

उपरोक्त बाबींचा विचार करता राज्य मंडळाच्या सर्व शाळांनी दिनांक १ मे २०२६ रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणाव्यात. उत्तरपत्रिका पालकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून दिल्यास पुढील प्रमाणे फायदे होतील -

> उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समज, अनुप्रयोग क्षमता व कौशल्यांचे अचूक निदान करता येईल.

> विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करण्यास सुलभ होईल. 

> तसेच वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन व गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील.

> गुणांपेक्षा कौशल्य व समज यांवर आधारित प्रगतीचे मोजमाप करणे शक्य होईल.

> विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालक अधिक सजग व जबाबदार होतील.

> अध्ययनातील उणिवा लक्षात घेऊन घरी नियमित सराव, पुनरावृत्ती व मार्गदर्शन देण्याची जबाबदारी पार पाडली जाईल.

> विद्याथ्यांच्या शैक्षणिक सवयी (अभ्यासाची वेळ, वाचन, लेखन) विकसित करण्यासाठी पालक सक्रिय भूमिका बजावतील.

> शाळा-घर या दोन्ही स्तरांवर समन्वय ठेवून शैक्षणिक वातावरण निर्माण करता येईल.

> शिक्षक-पालक यांच्यात सतत संवाद होईल.

> विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संयुक्त कृती आराखडा तयार करता येतो.

> मूल्यमापन प्रक्रियेबाबत पालकांचा विश्वास दृढ होतो.

> विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ व पारदर्शक चित्र समोर येते.

> आत्मपरीक्षणातून सुधारणा करण्याची प्रेरणा मिळते.

> शैक्षणिक तसेच वर्तनात्मक प्रगतीवर पालकांचे लक्ष केंद्रीत होईल.


वरील प्रमाणे दिलेल्या सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील राज्य मंडळाच्या सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना निदर्शनास आणून त्याप्रमाणे अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही त्वरीत करावी.

निकाल जाहीर करणेबाबत परिपत्रक डाउनलोड करा. - Click Here

Post a Comment

0 Comments

close