Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रतिनियुक्ती म्हणजे काय? | प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत शासन परिपत्रक

निवडणुक वा अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत शासन परिपत्रक 



सर्व क्षेत्रिय कार्यालयांकडून शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत, अशा शिक्षकांची प्रतिनियुक्तीने कार्यरत कालावधीसह माहिती तात्काळ सादर करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते.


सर्व संबंधीत क्षेत्रिय कार्यालयाकडून प्राप्त माहिती शासनास सादर करण्यात आलेली आहे. त्यानुसार झालेल्या बैठकीमध्ये निवडणूक व अन्य कामावर प्रतिनियुक्त असलेल्या सर्व शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर बैठकीतील निर्देशानुसार सर्व संबंधीत शिक्षकांना (स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षक निवडणूक व अन्य कामाकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत असणा-या) त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करण्याबाबत आपले स्तरावरुन उचित कार्यवाही करावी.

तसेच आपल्या जिल्ह्याकडून या कार्यालयास सादर केलेल्या माहितीमधील सर्व शिक्षक त्याचे मूळ आस्थापनेवर रुजू होतील असे पहावे. या कार्यालयास सादर केलेल्या माहिती व्यतिरिक्त शिक्षकांची प्रतिनियुक्ती शासकीय कार्यालयात असेल तर त्या कार्यालय प्रमुखांशी संपर्क करुन त्यांनाही कार्यमुक्त करण्याचे निर्देश द्यावेत.


सर्व संबंधीतांना कार्यमुक्त केल्याचे आदेशानंतरही शिक्षक जर मूळ आस्थापनेवर रुजू झाले नाही तर, त्या शिक्षकांचे माहे मे, २६ पेड इन माहे जून २६ पासूनचे वेतन अदा होणार नाही याबाबत आपण दक्षता घ्यावी. याबाबत संबंधीत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना आपल्या स्तरावरुन आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत.


तसेच शासन पत्राच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील किती शिक्षक निवडणुक व अन्य कामांकरीता प्रतिनियुक्तीने कार्यरत होते व किती शिक्षक हे मूळ आस्थापनेवर रुजू झालेले आहेत. याचा एकत्रित अहवाल दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत या कार्यालयास सादर करावा. जेणेकरुन एकत्रित अहवाल सत्वर शासनास सादर करणे शक्य होईल.


प्रतिनियुक्ती म्हणजे काय?

प्रतिनियुक्ती (Deputation) म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची त्याच्या मूळ विभागातून (पालक विभाग) विशिष्ट कालावधीसाठी किंवा विशिष्ट उद्देशासाठी दुसऱ्या विभागात, सरकारी संस्थेत किंवा इतरत्र तात्पुरत्या स्वरूपात केलेली नियुक्ती होय.

प्रतिनियुक्तीबद्दलच्या काही मुख्य गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:

तात्पुरते स्वरूप: ही कायमस्वरूपी बदली नसते. प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्मचाऱ्याला पुन्हा त्याच्या मूळ विभागात (Parent Department) परतावे लागते.

हेतू: नवीन कौशल्ये शिकणे, एखाद्या विशेष प्रकल्पासाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे किंवा रिक्त पदांची तात्पुरती पूर्तता करणे, हे प्रतिनियुक्तीचे मुख्य उद्देश असतात.

वेतन आणि पद: या काळात कर्मचाऱ्याचे मूळ पद तसेच राहू शकते किंवा तो समकक्ष पदावर जाऊ शकतो. नियमांनुसार त्याला मूळ वेतनासोबत काही अतिरिक्त भत्ता (Deputation Allowance) मिळू शकतो.

मंजुरी: प्रतिनियुक्ती ही सामान्यत: संबंधित कर्मचारी आणि दोन्ही विभागांच्या संमतीनेच केली जाते.


प्रतिनियुक्तीने नियुक्त शिक्षकांना त्यांचे मूळ आस्थापनेवर रुजू होण्यासाठी तात्काळ कार्यमुक्त करणेबाबत शासन परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close