Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ई-कचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय विशेष उपक्रम राबविण्याबाबत

विशेष मोहीम ६ अंतर्गत २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-कचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय विशेष उपक्रम राबविण्याबाबत शासन परिपत्रक 





एकदिवसीय विशेष उपक्रमः सर्व कार्यालये आणि शाळांमध्ये २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-कचरा व्यवस्थापनावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जावा.


प्रार्थना सभा आणि प्रश्नमंजुषाः शाळांच्या २८ ऑक्टोबरच्या प्रार्थना सभेचा मुख्य विषय "ई-कचरा व्यवस्थापन" असावा. तसेच विद्यार्थ्यांसाठी ई-कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाट यावर आधारित एक छोटी प्रश्नमंजुषा (Quiz) आयोजित करावी.


ई-कचरा संकलनः ऑक्टोबर २०२६ महिनाभर जनजागृती आणि ई-कचरा गोळा करण्याचे काम सुरू ठेवावे. महिनाभरात गोळा झालेला सर्व कचरा २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत recyclers /refurbishers सुपूर्द करावा.


अधिकारी वर्ग आणि मदतः गट/जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी शाळांना केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ/राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळ (CPCB/SPCB) कडे नोंदणीकृत Recycling शोधण्यासाठी आणि ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मदत करावी.


अहवाल सादर करणे (Reporting): महिनाभरात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची आणि गोळा केलेल्या ई-कचऱ्याची माहिती Eco clubs for Mission LIFE पोर्टलवर (iecoclubs.education.gov.in) २८ ऑक्टोबर २०२६ रोजीच अपलोड करण्यात यावी.


महिनाभरात राबवण्यात आलेल्या उपक्रमांची आणि गोळा केलेल्या ई-कचऱ्याची माहिती भरण्यासाठी लिंक

iecoclubs.education.gov.in


याबाबत सर्व संबंधित शाळा आणि यंत्रणेला या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करून सोबत जोडलेल्या सूचनापत्रकानुसार नमूद लिंकवर माहिती भरण्याबाबत आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात.


विशेष मोहीम ६ अंतर्गत २८ ऑक्टोबर २०२६ रोजी ई-कचरा व्यवस्थापनावर एकदिवसीय विशेष उपक्रम राबविण्याबाबत शासन परिपत्रक - Click Here

Post a Comment

0 Comments

close