Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शालार्थ पोर्टलवर चुकीची दुरुस्ती करणेबाबत | कर्मचाऱ्याचे नाव, जन्म दिनांक, नियुक्ती दिनांक बदलणे व त्यासाठी आवश्यक पुरावे सादर करणे बाबत सूचना

शालार्थ पोर्टलवर चुकीची दुरुस्ती करणेबाबत | कर्मचाऱ्याचे नाव, जन्म दिनांक, नियुक्ती दिनांक बदलणे व त्यासाठी आवश्यक पुरावे / अभिलेखे सादर करणे बाबत सूचना



ज्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात बदल/जेंडर बदल करणे बाबतचे प्रस्ताव अधिक्षक (वेतन पथक) / शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले आहेत, त्या संदर्भात प्रकरणनिहाय असे प्रस्ताव मुळ अभिलेखे आधारे पडताळणी करुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करावेत. प्रकरणनिहाय पुढील अभिलेख्यांची पडताळणी करुनच असे प्रस्ताव शिफारशीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात यावेत.


शालार्थ प्रणालीवर बदल करावयाचा तपशील व पडताळणी करावयाचे अभिलेखे

अ) नियुक्ती दिनांक - संस्था नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वैयक्तिक मान्यता आदेश पडताळणी करावी.

ब) जन्म दिनांक - विहित प्राधिकारी यांचे जन्म प्रमाणपत्र अथवा एस.एस.सी. प्रमाणपत्र पडताळणी करावी.

क) नावात बदल - राज्य शासनाचे राजपत्र अथवा एस.एस.सी. प्रमाणपत्र अथवा आधार कार्ड अथवा विवाह प्रमाणपत्र पडताळणी करावी.

ड) जेंडर / लिंग बदल - जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला अथवा आधार कार्ड. ई पडताळणी करावी.


उपरोक्त प्रमाणे अभिलेख्यांची पडताळणी करुन असे परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे सादर करावेत. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुनःश्च अभिलेख्यांची (मुळ प्रत अथवा शालार्थ डिजीटलायझेशन मधील उपलब्ध माहिती आधारे) पडताळणी करुन शालार्थ प्रणालीवर त्यांचे लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सुविधेचा वापर करुन उपरोक्त प्रकरणी शालार्थ पोर्टलवरील नोंदी दुरुस्त कराव्यात.


श्री. पवन जोशी, बिझनेस ॲनालिस्ट, (शालार्थ सिस्टीम) महाआयटी, मुंबई. यांना देऊन कळविण्यात येते की उपरोक्त नुसार कार्यवाही करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ते तांत्रीक बदल करण्यात यावेत. ज्या वेळी कोणत्याही माहिती दुरुस्त करावयाची असल्यास नव्याने समाविष्ठ होणारी माहिती व त्यापूर्वीची माहिती प्रणालीवर संग्रही ठेवण्यात यावी. बदल केलेली व बदलापूर्वीची माहिती कोणत्याही परिस्थितीत प्रणालीवरुन हटविण्यात/काढून टाकण्यात येऊ नये.


Post a Comment

0 Comments

close