Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विषय समित्या स्थापन करुन त्यांचे whatsapp group तयार करणेबाबत परिपत्रक

जिल्हा स्तरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विषय समित्या स्थापन करुन त्यांचे whatsapp group तयार करणे...





जिल्हा स्तरावर विविध विषय शिक्षकांच्या विषय समित्या स्थापन केलेल्या आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये विषय समित्या स्थापन केलेल्या नसतील तर तात्काळ स्थापन कराव्यात. विषय समित्यांमध्ये कृतीशील व समर्पितपणे काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश असावा. विषय समित्यांमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम घेण्यात यावेत तसेच चाचणीद्वारे इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययनस्तर निश्चित करुन घ्यावा.


विषयनिहाय स्थापन करण्यात आलेल्या विषय समितीचा whatsapp group तयार करुन त्यामध्ये शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागात काम करणारे शिक्षण विस्तार अधिकारी हे सुध्दा असावेत.


खालील प्रमाणे किमान विषय समित्या स्थापन असाव्यात

माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते १० वी) मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल.

उच्च माध्यमिक स्तर (इयत्ता ११ वी ते १२ वी) मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, इतिहास, Book keeping and accountancy, Economics, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन.

गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, Teaching-Learning Material, Videos निर्मिती, Career Guidance याबाबत विषय समित्यांच्या सदस्यांशी मा. आयुक्त (शिक्षण) youtube Channel द्वारे संवाद साधणार आहेत.


राज्यस्तरीय whatsapp group स्थापन केला जाईल. त्यामध्ये प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक विषयाचे उत्कृष्ट, निवडक व नवोपक्रमशील ५ विषय शिक्षकांचा समावेश करण्यात यावा.


परख सर्वेक्षणानुसार इयत्ता ६ वी, इयत्ता ९ वी ची गुणवत्ता ही इयत्ता ३ री चे तुलनेत कमी होत असल्याचे दिसून येते. यास्तव इयत्ता ६ वी ते १२ वी च्या गुणवत्ता वाढीसाठी विषय समित्यांनी प्रयत्न करावेत.

विषय निहाय स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा अहवाल संचालनालय कार्यालयाला सादर करावा.


माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विषय समित्या स्थापन करुन त्यांचे whatsapp group तयार करणेबाबत परिपत्रक 


Post a Comment

0 Comments

close