Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान कसे कराल?

📌 पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
📌 बॅलट म्हणजे मतपत्रिकेवरच मतदान होतं. त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.
📌 मतपत्रिकेवर नमूद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.
📌 सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठीइंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.
📌 पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील). 
📌 मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत. टिकमार्क ☑️   किंवा क्रासमार्क ❎ असलेल्या खुणा करु नयेत.
📌 मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.  
📌 "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.
'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.
See the latest update on election Commission of Maharashtra website - Click Here

महत्त्वाचे हे ही वाचा.
Tags
विधानपरिषद मतदारसंघ निवडणूक
पदवीधर मतदार संघ
शिक्षक मतदार संघ 
शिक्षक आमदार
मतदान कसे करावे

Post a Comment

0 Comments

close