पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यानिमित्त मतदान केंद्राची रचना कशी असेल याबाबतची माहिती सर्व मतदारांना असणे आवश्यक आहे.
💥 कोरोनाबाधित किंवा विलगीकरणात असलेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिकेची सुविधा देण्यात येणार आहे.
💥 केंद्रावर आलेल्या एखाद्या मतदाराला ताप, खोकला आदी लक्षणे आढळल्यास त्यांना टोकन देऊन दुपारी 4 वाजता मतदान केंद्रावर येण्याचे सूचित करावे.
💥 त्याच दिवशी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांना पीपीई कीट देण्यात येईल.
💥 लक्षणे आढळलेल्या व बाधित असलेल्या मतदारांसाठी केंद्रावर स्वतंत्रपणे बसण्यासाठी विलगीकरण कक्षाची सुविधा असेल.
💥 प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आदी सुविधा असतील.
मतपत्रिकेचा रंग गुलाबी, तर जांभळ्या पेनाने नोंद
मतपत्रिकेचा रंग गुलाबी असेल, तसेच ती इंग्रजी व मराठी भाषेत असेल. केंद्रासाठी मतदार यादी तीन प्रतीत असेल. त्यातील एक चिन्हांकित असेल. जांभळ्या शाईचा विशेष पेन पुरवला जाईल. त्यानेच नोंदी होणे आवश्यक आहे. चुकूनही कुणीही इतर पेन वापरू नये, अन्यथा मत बाद ठरु शकते.
0 Comments