Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाजगी विनाअनुदानित ते अनुदानित शिक्षक बदली पोर्टलवरील माहिती भरण्याचे कामकाज पूर्ण करणेबाबत...

खाजगी विनाअनुदानित ते अनुदानित शिक्षक बदली पोर्टलवरील माहिती भरण्याचे कामकाज पूर्ण करणेबाबत...



राज्यातील खाजगी विनाअनुदानित शाळांमधील वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पर्यंतची माहिती संचमान्यतेमध्ये भरण्यासाठी मुख्याध्यापक (HM) लॉगिनला Tab उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ तांत्रिक संचालक, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्र (NIC), पुणे यांना कळविण्यात आले होते.

त्या अनुषंगाने वरिष्ठ तांत्रिक संचालक, NIC यांच्याकडून सदर सुविधा (Access) पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर माहिती भरण्याची/अद्ययावत करण्याची सुविधा दि.०८.०८.२०२६ पर्यंतच उपलब्ध असणार आहे. तसेच सदर माहिती भरण्याबाबतचा "खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती मुख्याध्यापक लॉगिनद्वारे भरावी" हा संदेश पोर्टलवरती Running strip द्वारे Highlight केला जाईल.

तरी सर्व खाजगी विनाअनुदानित शाळांच्या मुख्याध्यापकांनी तात्काळ बदली पोर्टलवरील वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांची माहिती भरण्याचे/अद्ययावत करण्याचे सर्व कामकाज दि.०८.०८.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात यावे. दिलेल्या मुदतीनंतर पोर्टलवरील सुविधा बंद झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची व कार्यालयाची राहील, याची नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments

close