म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा 'आंतरराष्ट्रीय योग दिवस ' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून हा 'योग दिन' महाराष्ट्रातील शाळा-कॉलेजांमध्ये साजरा केला जात आहे. याबरोबरच यापुढे राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, अशी घोषणा शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.
क्रीडामंत्री तावडे यांनी गुरुवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील क्रीडा अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. दरवर्षी २१ जून रोजी योग दिवस साजरा केला जात आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या २१ तारखेला सुट्टी असल्यास, त्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा. योगामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याबरोबरच आजच्या धावपळीत आवश्यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होईल, असे तावडे यांनी स्पष्ट केले. 'मिशन वन मिलिअन'वेळी राज्यभरात राबविलेल्या अभियानाचे सर्व फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, योग दिनानिमित्त राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमाचे फोटो एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात यावे आणि त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार कण्यात यावे. योग दिन फक्त २१ जून रोजीच साजरा करून उद्दिष्ट साध्य होणार नाही. या दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये योग महोत्सव आयोजित करण्यात यावेत, यात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments