म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत शिक्षकांना मतदान करता यावे यासाठी शाळांना २५ जून रोजी विशेष सुट्टी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिक्षकांकडे रजेचा अर्ज मागितल्याची तक्रारी शिक्षक करत आहेत. मात्र या दिवसासाठी रजा कापण्यात येऊ नये, अशी मागणी शिक्षक परिषदेने शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे
जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मुंबईतील उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागातील सर्व शाळांतील शिक्षकांना मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून २५ जून रोजी विशेष सुट्टी जाहीर केली. त्यामुळे शिक्षक मोठ्या संख्येने मतदान करू शकले. मात्र मुंबईत दुसऱ्या दिवशी शाळा प्रशासनाने शिक्षकांना 'किरकोळ रजे'चा अर्ज मागितल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेत शिक्षक परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी बुधवारी शिक्षण उपसंचालकांकडे शाळांनी रजेच्या अर्जाची मागणी करू नये. तसेच त्याविषयी शाळांना पत्र देऊन संभ्रम दूर करावा, अशी मागणी केली.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments