Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रक्षोभक भाषणाबद्दल मुख्याध्यापकावर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, जालना
तालुक्यातील रामनगरच्या शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गोरे यांच्या विरोधात अखेर कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांनी आंदोलनप्रसंगी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर एका शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन गोरे यांच्या विरोधात निवेदन दिले होते. ठाण्यात पाचशे नागरिकांनी गुरुवारी सायंकाळपासून चार तास ठिय्या आंदोलन केले. गोरे यांच्या विरोधात उषा देशपांडे यांनी तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांच्या भाषणाची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिल्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. त्यांचे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ते वक्तव्य म्हणजे गोरे यांचे वैयक्तिक मत असून शिवाजी शिक्षण संस्थेचा या सगळ्या प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments

close