*स्विफ्ट की (SWIFT KEY)*
विविध सुविधा असलेला मायक्रोसॉफ्टचा हा कीबोर्ड वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामध्ये तुम्ही जितका अधिक ह्याचा वापर कराल, तितके तुम्ही टाईप करताना पुढचे शब्द हा सुचवतो. त्याचप्रमाणे जर यावर अकाऊंट असेल तर, फोन बदलला तरी यात सेव्ह असलेले शब्द आणि सेटिंग्ज नवीन फोनमध्येसुद्धा दिसतात. या कीबोर्डची साईज फोनच्या साईजनुसार ठेवायची सोय उपलब्ध आहे. या कीबोर्डसाठी वेगवेगळ्या थीम्स ठेवायचासुद्धा पर्याय आहे.
*जी (G) बोर्ड*
गुगलच्या ह्या कीबोर्डमध्ये G आयकॉन प्रेस करून कीबोर्डमधूनच सर्च करण्याची सोय आहे. यामध्ये गुगल, YouTube, मॅप्स आणि कॉन्टॅक्ट सर्चचा पर्याय आहे. या कीबोर्डचा स्पेस बार वापरून मागे-पुढे करता येते. ईमोजी आणि जीआयएफ (GIF) फाइल्ससुद्धा कीबोर्डमधूनच ह्यातून शोधता येतात. ह्या कीबोर्डच्या मदतीनं इतर भाषांमध्येसुद्धा लिहिता येतं आणि हल्लीच ह्यामध्ये आयओएससाठी (iOS) मराठी भाषा समाविष्ट करण्यात आली आहे.
*फ्लेक्सी (Fleksy)*
वेगवेगळ्या थीम्स उपलब्ध असणारा हा कीबोर्ड वापरायला सोपा आहे. ४० पेक्षा जास्त भाषा हा कीबोर्ड सपोर्ट करतो. हा कीबोर्ड ३ आकारांमध्ये वापरता येऊ शकतो. यामध्ये स्पेस बारने पुढे-मागे करता येतं आणि त्याच प्रमाणे बॅक स्पेसनं एक-एक अक्षर डिलीट न करता अख्खा शब्दसुद्धा डिलीट करता येतो. या कीबोर्डमधूनच YouTube आणि GIF फाइल्स शेअर करता येतात.adityadhas
*मिनम (Minuum) कीबोर्ड*
ज्यांच्या हाताची बोटे जाड असतात अशांना नेहमीचे कीबोर्ड वापरायला अवघड जाऊ शकतं. हा कीबोर्ड फोनची कमीत कमी जागा व्यापून टाईप करण्याची सुविधा देतो. हा कीबोर्ड टाईप करायला सुरुवात केल्यावर पुढचा शब्द सूचितसुद्धा करतो. त्यामुळे सगळे शब्द टाईप करण्याची गरज भासत नाही. अँड्रॉइड आणि आयओएसवर (iOS) हा कीबोर्ड पेड अँप्लिकेशन्स मध्ये उपलब्ध आहे.
*टच पल (Touch Pal) कीबोर्ड*
टाइप करताना जर काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करत, त्याचप्रमाणे पुढचा शब्द काय असू शकेल हे देखील हा कीबोर्ड दाखवतो. यामध्ये Talia हे AI असिस्टंट उपलब्ध आहे. ज्यामुळे आपण जवळची हॉटेल्स, चलनाचा दर, सिनेमाची वेळ इत्यादी गोष्टी विचारून त्या शेअर करू शकतो. हा कीबोर्ड आपला चेहरा वापरून अवतार इमोजीसुद्धा तयार करून त्या शेअर करायचा पर्याय देतो.
अनुपम भाटवडेकर
muntainbox@gmail.com


0 Comments