Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दाखल्यासाठी लाच घेणारी मुख्यध्यापिका, लिपिक गजाआड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
सातवी उत्तीर्ण असल्याचा शाळेचा दाखला देण्यासाठी २०० रुपयाची लाच घेणाऱ्या मुख्यध्यापिका आणि लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी दुपारी बायजीपुरा येथील सर सय्यद उर्दू शाळेत करण्यात आली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराची पुतणी सर सय्यद उर्दू शाळेत सातव्या वर्गात शिक्षण घेत होती. या विद्यार्थिनीचा शाळा सोडल्याचा दाखला काढायचा होती. या कामासाठी मुख्यध्यापिका समीन सय्यद इफ्तखारोद्दिन (वय ५७) आणि हैदरखान हुसेनखान पठाण (वय ४६) यांनी २०० रुपयाच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तिच्या काकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी शुक्रवारी पथकाने शाळेत सापळा रचला. मुख्यध्यापिकेच्या दालनात लाच घेताना दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक शंकर जिरगे, उपाधिक्षक बी. व्ही. गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक विलास घनवट, विजय बाम्हंदे, रवींद्र आंबेकर, संतोष जोशी, मिलिंद इप्पर, एस. आर. दिवे यांनी केली.

Post a Comment

0 Comments

close