म.टा. प्रतिनिधी, नागपूर
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्यावतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेची 'अॅन्सर की' जाहीर करण्यात आली आहे. नेट परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ntanet.nic.in या संकेतस्थळावर ही 'अॅन्सर की' देण्यात आली आहे. २० ते २६ जून दरम्यान ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून ६ लाख ८१ हजार ७१८ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि त्यांनी दिलेली उत्तरे बघायला मिळणार आहेत, असे एनटीएने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे. अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना आपले आक्षेपही नोंदविता येणार आहेत. आपले आक्षेप नोंदविण्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी विद्यार्थ्यांना एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. आक्षेप बरोबर ठरल्यास विद्यार्थ्यांना पैसे परत मिळणार आहेत. ३ जुलैला सायंकाळी ५ पर्यंत विद्यार्थ्यांना आपले आक्षेप नोंदविता येतील. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नपत्रिका उत्तरे सेव्ह करून ठेवावीत, असेहीने एनटीने कळविले आहे. परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर केला जाईल. या परीक्षेत पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणी केली जाणार नाही. सहायक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिपकरिता ही परीक्षा घेण्यात येते. या आधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत असे. डिसेंबर, २०१८ पासून एनटीएच्या वतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. एकूण ८१ विषयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेकरिता २३७ शहरांमध्ये ६१५ केंद्रे प्रस्थापित करण्यात आली होती. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही सुरक्षा लावण्यात आली होती. याशिवाय परीक्षा केंद्रांवर जॅमर्सही लावण्यात आले होते. परीक्षेआधी ४ हजार सराव केंद्रे स्थापन करण्यात आली होती आणि सुमारे १० लाख विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला, असे एनटीएने म्हटले आहे.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments