Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गणित गिरणी

*माझी शाळा,माझे उपक्रम* 〇 ════════════════ *📚 गणिती गिरणी📚* ━━━━━━━━━━━━━━━━ *गणिती गिरणी या शैक्षणिक साहित्यातून बेरीज.,वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रिया शिकवता येतात.* *🎉संबोध : -* सदरील गणिती साहित्याच्या आधारे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार व इतर क्रियांचा सराव देता येतो. *🎉साहित्य :-* वापरलेल्या वहयाचे खपट, पांढरा कागद, फेविकॉल व कात्री. *🎉मुलांचा सहभाग: -* एका वेळी एकच विद्यार्थी किंवा गटागटाने. *🔸साहित्य तयार करण्याची कृती* 👉खपटाचे सहा गोल तयार करून घ्यावे. 👉खपटाचे तयार केलेल्या गोलांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे काडकीच्या साह्याने दोन खपटांना अडकवून घ्यावे. 👉पहिल्या गोलावर 0ते9 अंक लिहावे. 👉दुसर्‍या गोलावर +, -, ×, ÷ असे चिन्ह काढावे. 👉 तिसऱ्या गोलावर 0ते9असे अंक लिहावे. 👉चौथ्या गोलावर = असे गोलाकार लिहा. 👉 पाचव्या व सहाव्या गोलावर 0ते9असे लिहावे. अशाप्रकारे गणिती गिरणी तयार झाली. *💎गणिती गिरणीच्या साह्याने गणिताचा सराव*. *👉उदाहरणार्थ👇* गणिती गिरणीवर ८+६= हे गणित सोडवायचे आहे. तर पहिल्या गोलावरून समोरच्या बाजूला ८.आणावे दुसर्‍या गोलावरून ६ आणावे , तिसऱ्या गोलवरील बरोबरच चिन्ह आणावे. मुलांना गणित सोडावयास लावून १४ उत्तरासाठी पाचव्यातील १ तर सहाव्या गोलवरील ४समोर आणावे तेव्हा गणिती गिरणीवर ८+६=१४ हे उत्तर येईल. *याचप्रमाणे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चारही क्रियांचा सराव साहित्याच्या मदतीने घेता येतो.* *गणिती गिरणी हे शैक्षणिक टाकाऊ वस्तूपासून बनवले आहे.* 📚━━━━msp-------------📚 *रंगनाथ सगर, लातूर* *महाराष्ट्र शिक्षक पँनल* 📞 *97 63 534721* 📞

Post a Comment

0 Comments

close