म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या नेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जप्रक्रिया सध्या सुरू असून आज (१५ ऑक्टोबर) अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. एनटीएतर्फे डिसेंबर २०१९ ते जून २०२० या कालावधीत होणाऱ्या विविध परीक्षांचे संयुक्त वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची अखेरची मुदत बुधवार, ९ ऑक्टोबर होती. परंतु, विद्यार्थ्यांच्या मागणीवरून या विहित मुदतीत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी या विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन एनटीएतर्फे करण्यात आले आहे.
नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट ही परीक्षा संगणकाद्वारे घेतली जाईल. २ ते ६ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. ३१ डिसेंबरला या परीक्षेचा निकाल जाहीर होईल. शैक्षणिक वर्षातील दुसरी यूजीसी नेट परीक्षा १५ ते २० जून २०२० या दरम्यान होईल. या परीक्षेसाठी १६ मार्च ते १६ एप्रिल २०२० अशी मुदत असेल. ५ जुलै २०२० ला निकाल जाहीर होईल. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा घेतली जाते. अन्य परिक्षा ऑनलाइन स्वरूपात असल्या तरी नीट परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत २ ते ३१ डिसेंबरपर्यंत असेल. ३ मे २०२० ला नीट परीक्षा होईल. ४ जूनला निकाल जाहीर होईल.
- Home-icon
- Online Update
- _Current Online Update
- _Student Portal Update
- _संचमान्यता अपडेट
- _All Scholarship Exam Update
- _Online Test
- __इ. १ली Online Test
- शैक्षणिक बातम्या
- _Latest News
- _शालेय स्पर्धा परीक्षा विषयक बातम्या
- _नवीन शासन निर्णय विषयक
- _जिल्हांतर्गत बदली
- _आंतरजिल्हा बदली
- _शिक्षणक्षेत्रातील आंदोलने
- शासन निर्णय
- _Latest शासन निर्णय
- _रजेविषयक शासन निर्णय
- _बदली विषयक शासन निर्णय
- _वरिष्ठ व निवड श्रेणी शासन निर्णय
- _वेतनविषयक शासन निर्णय
- _पवित्र पोर्टल शासन निर्णय
- _अनुकंपा भरती शासन निर्णय
- CCE प्रश्नपत्रिका व नोंदी
- _प्रथम सत्र मुल्यमापन
- _द्वितीय सत्र मूल्यमापन
- _आकारिक नोंदी-इयत्ता व विषय
- शालेय स्पर्धा परीक्षा
- _शिष्यवृत्ती परीक्षा
- _नवोदय परीक्षा
- _NMMS Exam
- _NTS Exam
- आरोग्यविषयक
- तंत्रज्ञान विषयक
- _आधार पॅन लिंकिंग
- _Google News
- _WhatsApp
- _Facebook
- हास्यकल्लोळ
- प्रेरणादायी पोस्ट


0 Comments