सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी ) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांबाबत....
राज्यात कोविड - १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लाँकडाऊन /संचारबंदी जाहीर केली होती व वेळोवेळी त्याचा कालावधी वाढविल्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२० परीक्षांचे निकाल माहे जुलै २०२० मध्ये जाहीर झालेले आहेत . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेस नियमित ,पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी , तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत .सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेस आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mhahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे
(१) माध्यमिक शाळा नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरून ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
बुधवार दि . २३ /१२ /२०२० ते सोमवार दि . ११ /०१ /२०२१
(२) माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षा , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त सुधार व तुरळक विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाने ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
मंगळवार दि.१२ /० १ / २०२१ ते
सोमवार दि. २५ / ०१ /२०२१
(३) माध्यमिक शाळांनी चलन Download करून चलनद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा
बुधवार दि .२३ / १२ २०२० ते
सोमवार दि .०१ /०२ /२०२१
हे पण वाचा.
12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे व चलन जमा करण्याच्या तारखाबाबत...
Tags
१०वी,शैक्षणिक बातम्या,परीक्षा,आवेदन पत्रे,



0 Comments