सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याच्या तारखांबाबत....
राज्यात कोविड - १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शासनाने लाँकडाऊन /संचारबंदी जाहीर केली होती व वेळोवेळी त्याचा कालावधी वाढविल्यामुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२० परीक्षांचे निकाल माहे जुलै २०२० मध्ये जाहीर झालेले आहेत . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेस नियमित ,पुनर्परीक्षार्थी , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी , तसेच श्रेणी सुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहेत .सदर परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेस आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mhahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे
(१) उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र ,करा व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रेSARAL Database वरून ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
मंगळवार दि . १५ /१२ /२०२० ते सोमवार दि . ४ / १ /२०२१
(२) उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थ्यां (Hsc Vocational Stream )पुनर्परिक्षा , यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त सुधार व तुरळक विषय घेऊन परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाने ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
मंगळवार दि.५ / १ / २०२१ ते
सोमवार दि. १८ / १ /२०२१
(३) उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयीन चलन Download करून चलनद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा
मंगळवार दि .१५ / १२ २०२० ते
सोमवार दि .२५ / १ /२०२१
हे पण वाचा.
10 वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन भरणे व चलन जमा करण्याच्या तारखेबाबत..
Tags
१२वी,शैक्षणिक बातम्या,परीक्षा,आवेदन पत्रे,


0 Comments