राज्यातील ३ पदवीधर व २ शिक्षक मतदार संघ यामध्ये पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. 27 ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सावटाखाली या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. मतदारांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला.
पुणे पदवीधर मतदार संघ
पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 2 लाख 11 हजार 450 मतदारांनी मतदान केले होते. पाच वाजेपर्यंत पुणे पदवीधरमध्ये 49.62 टक्के मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली.
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात दुपारपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये सायंकाळपर्यंत पर्यंत 48.76 टक्के मतदानाची नोंद झाली. औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचं आव्हान आहे.
नागपूर पदवीधर मतदार संघ
नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सायंकाळपर्यंत 54.35 टक्के मतदान झालं आहे. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली.
अमरावती शिक्षक मतदार संघ
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत 82.91 टक्के मतदान झाले. मतदानासाठी अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. अमरावती विभागातमध्ये एकूण 35622 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावती विभागात प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये होत आहे.
पुणे शिक्षक मतदार संघ
पुणे शिक्षक मतदारसंघात सायंकाळपर्यंत 70 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसनगावकर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जितेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. 2014 ला विजयी झालेले दत्तात्रय सावंत यांनीही निवडणूक लढवली आहे.
महत्त्वाचे
पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक निकाल अपडेटसाठी येथे टच करा.


0 Comments