माध्यमिक शालान्त परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (इ.१२वी) परीक्षा एप्रिल - मे 2021 व पुरवणी परीक्षा सन 2021 साठी करावयाच्या विशेष उपाययोजना निश्चित करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे.
कोरोना च्या वाढत्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या परीक्षा होतील की नाही याबाबत सोशल मीडियामधून वेगवेगळे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहेत. सोशल मिडीयावरील अशा मेसेज वर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
दहावी बारावी परीक्षेबाबत विधानसभेत चर्चा
यावर्षी परीक्षा होणारच आहे, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलं. आमची प्राथमिकता मुलांच्या आरोग्याला आहे. त्यामुळे सर्व काळजी घेऊनच आम्ही परीक्षा घेणार आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. दहावीच्या, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन घेतली होती. दोन महिने दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिका वितरणासाठी लागतात, त्यामुळे ती प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. त्यामुळे काठिण्य पातळीबाबत उपस्थित केलेला मुद्दा आता गौण आहे. भौगोलिक स्थिती बघून आपण टाईमटेबल ठरवलं आहे, असं वर्षा गायकवाड विधानसभेत म्हणाल्या.
दहावी बारावीच्या परीक्षा (एप्रिल-मे 2021) नियोजित वेळापत्रकानुसार च ऑफलाईन होणार
दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे 2021 व पुरवणी परीक्षा सन 2021 कशा घ्याव्यात यासाठी विशेष उपाययोजना निश्चित करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आलेली आहे. सदर समितीची प्रथम बैठक मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत आज (दि. 5 मार्च) रोजी घेण्यात आली. नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आहेत. परीक्षेचे आयोजन करताना येणाऱ्या अडचणीवर करावयाच्या उपाययोजना बाबत सदर बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षा यावर कशा प्रकारे भर देता येईल यावरही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले. परीक्षा होणारच असल्याने विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करुन परीक्षेची तयारी करावी.
Useful - IGNOU BEd प्रवेश पात्रता परीक्षा 2021 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे टच करा.
दहावी-बारावीच्या परीक्षा संदर्भात उपाययोजना करण्यासाठी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, वसंत काळपांडे, मंडळाचे माजी अध्यक्ष विनय दक्षिणदास, यांच्यासह शिक्षण मंडळातील इतर अधिकारी, पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक,विजय जाधव, कात्रज येथील शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य, विकास गरड, पुणे मंडळाचे सदस्य नितीन म्हेत्रे आदींचा समावेश आहे.
परीक्षेबाबत उपाययोजना निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सल्लागार समिती डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
दहावी बारावीच्या परीक्षा सन 2021 चे अंतिम वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
महिला शिक्षकांसाठी शारीरिक शिक्षण व समुदाय प्रशिक्षण कार्यक्रम
How to Register❓Step by Step Guide👇
या प्रशिक्षणात जगातील उत्कृष्ट प्रशिक्षकाकडून शिकण्याची संधी महिला शिक्षकांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रत्येक महिला शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
दहावी बारावी परीक्षा एप्रिल - मे 2021 साठी करावयाच्या विशेष उपाययोजना निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली सल्लागार समिती पहा.
कोविड - १९ च्या पार्श्वभूमीवर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे आयोजन करताना आवश्यक उपाययोजना निश्चितीसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीची प्रथम बैठक आज राज्यमंडळ, पुणे येथे घेण्यात आली.@CMOMaharashtra pic.twitter.com/nrGpoIpv4A
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) March 5, 2021



0 Comments