Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

MH SET 2021: राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट 2021 परीक्षेची तारीख जाहीर

MH SET EXAM 2021: राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची तारीख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. सेट परीक्षा रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. 

सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी एकत्रित घेतली जाते. यंदाची घेतली जाणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेची (SET) तारीख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University)  जाहीर केली आहे. ही परीक्षा यावर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा रविवार, २६ सप्टेंबर २०२१ रोजी ही परीक्षा घेतली जाईल. 

सेट परीक्षेचे आयोजन - सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडूनच का केले जाते ❓सविस्तर माहितीसाठी येथे टच करा.  

SET Exam 2021 syllabus PDF

सेट परीक्षा 2021 संपूर्ण अभ्यासक्रम PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

या परीक्षेच्या संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. २६ सप्टेंबर २०२१ रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ मे २०२१ ते १० जून २०२१ अशी मुदत देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा (SET) अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी लिंक. Click Here. 

सेट परीक्षा 2021 विषयी संपूर्ण माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे.

सेट परीक्षा 2021 संपूर्ण माहितीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी - Click Here


सेट परीक्षा कोणासाठी ? 

एसईटीसाठी पात्र ठरलेला असा उमेदवार केवळ विद्यापीठ / संबद्ध महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्त होण्यास पात्र असेल तर त्यांनी यू.जी.सी. द्वारे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी विहित केलेली इतर शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असेल तर. आणि त्याची निवड संबंधित निवड समितीने केली आहे. नेट / यूजीसी-सीएसआयआर संयुक्त चाचणी विपरीत एसईटीला पात्र ठरलेले उमेदवार केवळ सहाय्यक प्राध्यापक म्हणून निवडले जाण्यास पात्र आहेत तर कनिष्ठ संशोधन फेलोशिप (जेआरएफ) च्या पुरस्कारासाठी नाही. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जून २००२ नंतर, एसईटी पात्र उमेदवारांनी ज्या एसईटी परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्याच राज्यातल्या विद्यापीठांमध्ये / महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करण्यास पात्र असेल.Tags

Post a Comment

0 Comments

close