Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने आयोजित विविध राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा... चित्रकला स्पर्धा | पोस्टर स्पर्धा | निबंध स्पर्धा | छायाचित्र स्पर्धा / व्हिडिओग्राफी

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने विविध राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला स्पर्धा | पोस्टर स्पर्धा | निबंध स्पर्धा | छायाचित्र स्पर्धा | व्हिडिओग्राफी स्पर्धा घेतल्या जातील. 


दरवर्षी २२ मे हा दिवस "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस" म्हणुन साजरा करण्यात येतो. हा दिवस साजरा करतानाची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना (Theme) "आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत" ("We're part of solution for nature") ही आहे. जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन तसेच जैवविविधतेची माहिती जन माणसात व्हावी, यादृष्टीने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. तरी विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे, असे आवाहन श्री प्रवीण श्रीवास्तव प्रधान मुख्य वनसंरक्षक, तथा सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांनी केले आहे. 


 परिपत्रक Download करण्यासाठी येथे टच करा. 


महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती :

१.  स्पर्धेक हा भारतीय असावा. 

2. वनविभाग  व  वनविभागातील  संलग्न   विभागातील ( वनविकास महामंडळ / वन्यजीव  सामाजिक वनीकरण मंडळ इ.) कर्मचारी अधिकारी यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

3. स्पर्धा व पारितोषिक संबंधी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा निर्णय अंतीम राहील. एकदा निकाल घोषित झाल्यानंतर त्याबाबत तक्रार स्विकारले जाणार नाही.

4. २ सदस्य चमु कडून प्रवेशिकेचे तपासणी करण्यात येईल.

1) प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ - 1

ii) प्राध्यापक / अध्यापक महाविद्यालयीन प्रतिनिधी - 1

ii) वनविभाग | सामाजिक वनीकरण विभाग / शासकीय अधिकारी-1

5. स्पर्धकाने ऑनलाईन प्रविशिकेच्या वेळी स्व:हस्ताक्षरात सहमती पत्र देऊन त्यामध्ये सविस्तर नाव पत्ता जन्म तारिख । ई-मेल / दुरध्वनी क्रमांक / आधारकार्ड व शैक्षणिक संस्थेचे नाव अंतर्भुत करावे.

6. स्पर्धकाने खालील प्रपत्रात स्व: हस्ताक्षरात माहिती भरावी किंवा टंकलेखीत करावे व ऑनलाईन प्रविशिकेच्या वेळी सादर करावी.

1. नाव:   2. लिंग:    3. जन्मतारिख:    4. रहिवासी पता :    5. शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ / संस्थेचे नाव :     6. आधारकार्ड नं :      7. फोन क्र.      8. ईमेल नं :      9. सही केलेले छायाचित्रे

7. स्पर्धेचा निकाल  जुन 2021 च्या  पहिल्या आठवड्यात  महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट www.mahaforest.gov.in वर घोषित करण्यात येईल व विजेत्यांना दिलेल्या ईमेल वर माहिती पाठविण्यात येईल.



महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आयोजित  चित्रकला स्पर्धा अटी व शर्थी

1) चित्रकला स्पर्धा वयोगट - पाचवी ते आठवी च्या वर्गातील विद्यार्थी

2) चित्रकला स्पर्धेकरिता चित्राचा आकार ३३x५० किंवा ५० x ७० सें.मी. राहील.

3) चित्रकला स्कॅन करुन पीडीएफ फाईल तयार करावी व दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावे.

4) चित्रासाठी कोणतेही माध्यम वापरले तरी चालेल. 

5) हार्ड कॉपी स्विकारल्या जाणार नाही. 

6) नाविन्यपुर्ण बाबींना प्राधान्य दिले जाईल.

7) व्यावसायिक चित्रकाराला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. फक्त विद्यार्थी, पालक, शिक्षक,नागरीक यांनाच सहभाग घेता येईल.

8) विषय - माझी आई, माझी वसुंधरा ( My Mother, My earth )

9) बक्षीस

प्रथम क्रमांक - 3000 रु

द्वितीय क्रमांक - 2000 रु

तृतीय क्रमांक - 1000 रु

10) चित्र पाठविण्यासाठी इ-मेल

msbb.ngpdrawingjunior@gmail.com

11) प्रवेशिका पाठविण्याची अंतीम तारीख 22.05.2021 अशी आहे. 


किशोर सुवर्ण महोत्सवी चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी व स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. (मुदत 31 मे पर्यंत ) 


महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आयोजित पोस्टर स्पर्धा अटी व शर्थी

1) पोस्टर स्पर्धा वयोगट - नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी

2) पोस्टर स्पर्धेकरिता चित्राचा आकार ३३x५० किंवा ५० x ७० सें.मी. राहील.

3) पोस्टरचे स्कॅन करुन पीडीएफ फाईल तयार करावी व दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावे.

4) चित्रासाठी कोणतेही माध्यम वापरले तरी चालेल. 

5) हार्ड कॉपी स्विकारल्या जाणार नाही. 

6) नाविन्यपुर्ण बाबींना प्राधान्य दिले जाईल.

7) व्यावसायिक चित्रकाराला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. फक्त विद्यार्थी, पालक, शिक्षक,नागरीक यांनाच सहभाग घेता येईल.

8) विषय - माझे आवडते प्राणी (पशु पक्षी) व कारणे

My favorite animal's (birds/animal) & why

9) बक्षीस

प्रथम क्रमांक - 3000 रु

द्वितीय क्रमांक - 2000 रु

तृतीय क्रमांक - 1000 रु

10) प्रवेशिका पाठविण्याची अंतीम तारीख 22.05.2021 अशी आहे. 

11) पोस्टर चित्र पाठविण्यासाठी इ-मेल

msbb.ngpdrawingsenior@gmail.com


महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आयोजित  निबंध स्पर्धा अटी व शर्थी

1) निबंध स्पर्धा वयोगट - पदवीधर व पदव्युत्तर हा असेल. 

2) निबंध स्पर्धेतील शब्दाची मर्यादा पदवीधर व पदव्युत्तर, पीएचडी धारकांकरिता ८०० ते १००० शब्द राहील.

3) निबंध तपासतांना विषयाचे ज्ञान, विश्लेषण, मांजणी, शुध्दलेखन, व हस्ताक्षर विचारात घेण्यात येईल.

4) निबंधांना ५ सेंमी मार्जिन असावी.

5) विषय - जैविक संसाधने हे कोविड - 19 समाधान आहे का? (होय / नाही )

Biological conservation is a solutiono towards pandemic Covid -19 (for of & against)

6) बक्षीस 

प्रथम क्रमांक - 4000 रु

द्वितीय क्रमांक - 2000 रु

तृतीय क्रमांक - 1000 रु

7) प्रवेशिका पाठविण्याची अंतीम तारीख 22.05.2021 अशी आहे. 

8) निबंध पाठविण्यासाठी इ-मेल

msbb.ngpeassy@gmail.com


महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ आयोजित  छायाचित्र / व्हिडिओग्राफी स्पर्धा अटी व शर्थी

1) या स्पर्धेसाठी वयोगट ओपन असेल. कोणीही स्पर्धक यात भाग घेवू शकतात. 

2) व्हिडिओ हा 2 ते 3 मिनिटांचा असावा. 

3) छायाचित्र / व्हिडिओ क्लिप्स मूल संकल्पनेशी संबंधित असावे. 

4) विषय - वन्यप्राणी हालचाल ( पोहतांना / धावतांना / पाणी पितांना /शिकार करतांना)

Subject - Wild animal in action (Swimming /running/chasing /hunting)

5) बक्षीस 

प्रथम क्रमांक - 7000 रु

द्वितीय क्रमांक - 5000 रु

तृतीय क्रमांक - 3000 रु

6) छायाचित्र / व्हिडिओ पाठविण्यासाठी इ-मेल

msbb.ngpphoto@gmail.com

7) प्रवेशिका पाठविण्याची अंतीम तारीख 22.05.2021 अशी आहे. 

Post a Comment

0 Comments

close