Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा Kishor Golden Jubilee Painting Competition

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा असे आवाहन कार्यकारी संपादक किशोर, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी केले आहे.


Join WhatsApp Group

किशोर चित्रकला स्पर्धेविषयीच्या सर्व माहितीसाठी video पहा. 👇



किशोर मासिकाचा इतिहास जाणून घ्या 👇

किशोर मासिक विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. Click Here

किशोर मासिक Android App 

किशोर मासिक चे Android App  डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here. 


किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेसाठी चित्र कसे काढावे? 

  • चित्र आर्टवर्क A-4 किंवा A-3 आकारात असावे.
  • चित्र कोणत्याही कोऱ्या कागदावर काढता येईल.
  • चित्रासाठी कोणतेही माध्यम वापरता येईल. उदा. जलरंग, ॲक्रेलिक, क्रेयॉन, चारकोल, रंगीत पेन्सिल, तैलरंग, स्केचपण इ. 
  • चित्र तुम्हांला सुचलेले व स्वतंत्र असावे. 
  • चित्रा सोबत तुमचे पूर्ण नाव, पत्ता, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहा.

सकाळ चित्रकला स्पर्धेविषयी ची माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 


किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेसाठी चित्र कसे पाठवावे? 

चित्र पोस्टाने किंवा इ-मेल ने पाठवू शकता. चित्र पाठवताना पाकिटावर किंवा इ-मेल मध्ये किशोर चित्रकला स्पर्धेसाठी असा उल्लेख असावा. 

चित्र पाठविण्यासाठी पत्ता - कार्यकारी संपादक किशोर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. बालभारती सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११ ००४

चित्र पाठविण्यासाठी इ-मेल - executive_editor_kishor@ebalbharati.in


किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे?


चित्रकला स्पर्धेसाठी चित्र पाठविण्याचा कालावधी

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेसाठी चित्र 31 मे 2021 पर्यंत पाठवता येईल.

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेचा निकाल

  • किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेचा अंतिम निकाल बालभारती च्या वेबसाइटवर घोषित केला जाईल.
  • विजेत्या पाच चित्रांना आकर्षक बक्षिसे दिली जातील  
  • निवडलेली चित्रे किशोर अंकामधून प्रसिद्धी केली जातील. 
  • चित्रांच्या निवडीसाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेत कोण सहभागी होवू शकतो? 

  • या स्पर्धेत इ.4थी ते इ.9वी च्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. 
  • सर्व माध्यमातील / सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. 

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेसाठी विषय 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत आपण वेगवेगळे अनुभव घेत आहोत. सतत हात धुणे, मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे इ. गोष्टी आता चांगल्याच अंगवळणी पडल्या आहेत. या काळात तुमच्या मनात अनेक विचार येत असतील, वेगवेगळ्या कल्पना सुचत असतील. आपल्या विचारांना व भावभावनांना चित्ररुपात मांडण्याची संधी किशोर संपादकांनी उपलब्ध करुन दिली आहे. तर मग सुरुवात करा तुम्हांला सुचलेले आणि नाविन्यपूर्ण असे चित्र काढायला. 

विषय - कोरोना 

स्पर्धेसाठी उपयुक्त नमूना चित्र

कोरोना जनजागृती विषयी चित्र कसे काढावे? Step by step Guide... 


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्या सर्व शिक्षक मित्रांना तसेच विद्यार्थ्यांना शेअर करा. 

पहा - आता दर शनिवारी किशोर गोष्टी. मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्टी


Post a Comment

0 Comments

close