Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

किशोर मासिकाची वाटचाल - सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोरचा घेतलेला आढावा

किशोर मासिकाची सुरुवात १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी करण्यात आली. किशोर’ हे मासिक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच (बालभारती) च्या वतीने सुरू करण्यात आले. हे मासिक ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रकाशित केले जाते.  


किशोर मासिकाची उद्दिष्टे 

  • ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी,
  • अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, 
  • त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. 

किशोर मासिक PDF डाउनलोड व किशोर मासिकाच्या वेबसाइट ला भेट देण्यासाठी येथे टच करा.  Click Here

किशोर मासिक Android ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

किशोर गोष्टी video स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 

किशोर गोष्टी video स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 

किशोर मासिकाची वाटचाल

१४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी किशोर मासिकाची सुरुवात करण्यात आली. किशोर’च्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर चित्रकार मुरलीधर आचरेकर यांनी काढलेले नेहरूंचे चित्र होते. पहिल्या अंकाच्या प्रती शाळांमध्ये मोफत वाटण्यात आल्या आणि विद्यार्थी-शिक्षकांची प्रतिक्रिया अजमावण्यात आली. ‘किशोर’ची नियमित छपाई जानेवारी १९७२ पासून सुरू झाली. पहिल्यांदा दहा हजार प्रती छापण्यात आल्या. सहा महिन्यांनंतर ‘किशोर’ची विक्री दरमहा २५ ते ३० हजार प्रती आणि दिवाळी अंकाची विक्री ३५ ते ४० हजार प्रतींपर्यंत गेली. आता दरमहा सरासरी ६५ हजार प्रती वितरित होतात. 

“तुमच्या बुद्धीला, तरल अशा कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासेला सतत काहीतरी हवे असते. काही अद्भुतरम्य विलक्षण असे पहावे, ऐकावे याकडे तुमचे मन सारखे झेपावते. या तुमच्या सर्वांगाने, सर्वांशाने फुलण्याच्या काळात तुम्हांला काही मदत करता आल्यास ती करण्याचा ‘किशोर’चा विचार आहे,' असे तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी आपल्या मनोगतात म्हटले होतं.

किशोर’ला कलात्मक मांडणी आणि आशय संपन्नतेचे अधिष्ठान दिले ते पहिले कार्यकारी संपादक वसंत शिरवाडकरांनी. किशोर चे पहिले संपादक वसंत शिरवाडकर यांची ‘असे हे विलक्षण जग!’ ही लेखमाला त्याकाळी खूप गाजली.

पहा - आता दर शनिवारी किशोर गोष्टी. मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्टी

श्री. वसंत शिरवाडकरांनंतर हरहुन्नरी लेखक वसंत सबनीस आणि त्यानंतर ज्ञानदा नाईक या कार्यकारी संपादकांनी ‘किशोर’ची ध्वजा आणखी उंचावली. या तिघांचाही मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी गाढा संपर्क. त्यामुळे उत्तमोत्तम कविता, कथा, ललित लेखन, प्रवासवर्णने, स्थलचित्रं, व्यक्तिचित्रे यांनी ‘किशोर’चे अंक समृद्ध झाले. सोबत विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण आदी विषय ‘किशोर’ने मुलांच्या भाषेत मांडले. मराठीतल्या बहुतांश लेखक-कवींनी किशोरसाठी लेखन केले आहे. अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवले. त्याचे श्रेय या तीनही कार्यकारी संपादकांचे आहे. ज्ञानदा नाईक यांच्यानंतर २००८ ते २०११ या कालावधीत बालभारतीचे विशेषाधिकारी माधव राजगुरू यांनी समर्थपणे ही परंपरा पुढे सुरू ठेवली. शाळाशाळांमध्ये 'किशोर मंच' स्थापन करून जास्तीत जास्त विद्यार्थी किशोरचे लाभधारक व्हावेत, यासाठी प्रयत्न केले. ‘किशोर’चे २०१९ सालचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांनीही नवीन सदरे आणि रंजक उपक्रमांची ही परंपरा कायम राखली आहे. २०२१ हे किशोर मासिकाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बालभारतीकडून किशोर सुवर्ण महोत्सवी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किशोर सुवर्ण महोत्सवी चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी व स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा. 

या ५० वर्षांत किशोर मासिकाने अनेक पिढ्यांवर वाचनाचे, ज्ञान-विज्ञानाचे व मूल्यांचे संस्कार केले आहेत. अनेक चित्रकार, कवी, लेखक यांना या मासिकाने घडवले आहे. 

किशोर मासिकाच्या मोबाईल ॲपचे उद्घाटन

सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोर मासिकाच्या मोबाइल ॲपचेही उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री मा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. यावेळी गायकवाड यांनी वाचकांना विशेष भेट देत किशोरची वार्षिक वर्गणी केवळ 50 रुपये करण्याची घोषणा केली. किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे? तसेच वाचन संस्कृतीला चालना मिळावी, यासाठी बालभारतीने ग्रंथालय सुरू करावे,असेही आदेश दिले.

किशोर मासिक Android ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा


सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बालभारतीकडून किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. किशोर सुवर्ण महोत्सवी चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी व स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा

वाचकाभिमुख किशोर

‘किशोर’ वाचकाभिमुख व्हावा म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. मुलांना गोष्टी, चित्रं, कोडी, विनोद असं हलकंफुलकं, चटपटीत वाचन हवं असतं. त्यानुसार बदल करण्यात येतात. 

विद्यार्थ्यांतून साहित्यिक

विद्यार्थ्यांनी लिहितं व्हावं म्हणून त्यांच्यासाठी साहित्याचा आणि चित्रांचा विभाग सुरू केला. विद्यार्थ्यांमधून लेखक घडावेत म्हणून ‘किशोर’नं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, वाड्यावस्त्यांवर, साखर शाळांमध्ये, दगडखाण कामगारांच्या मुलांच्या शाळांमध्ये, आदिवासी पाड्यांत लेखन कार्यशाळा घेतल्या. कविता, कथा, लेख कसे लिहावेत याचं मार्गदर्शन वसंत बापट, यदुनाथ थत्ते, महावीर जोंधळे, माधव वझे, अनिल तांबे, बाळ सोनटक्के, विजया वाड, प्रवीण दवणे आदींनी केलं. 

किशोर मासिकाची यशस्विता

सर्वोत्तम ते देण्याची धडपड मासिकात प्रतिबिंबित होत असल्यानं ‘किशोर’ विविध व्यासपीठांवर नावाजला गेला. तीन अंकांना राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील साहित्य संघाची बक्षीसं मिळाली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं मार्च १९७३ आणि नोव्हेंबर १९७६ च्या अंकांना छपाई आणि सजावटीसाठी अनुक्रमे श्रेष्ठता प्रमाणपत्र आणि प्रथम पुरस्कार देऊन गौरवलं. आजपर्यंत मासिकाला वेगवेगळी ४५ पारितोषिकं मिळाली आहेत.

किशोर मासिकातील गाजलेली सदरे

माझे बालपण’, ‘सुटीचे दिवस’, ‘माझा गाव’, ‘चित्रकथा’, ‘फास्टर फेणे’, देशोदेशींच्या कथा मुलांपर्यंत पोचवणारं ‘देशांतर’ ही या मासिकातली काही गाजलेली सदरं

Post a Comment

1 Comments

close