शिकू आनंदे Learn with fun आजचा भाग व यापूर्वीचे सर्व कार्यक्रम पहा.
July 09, 2021
इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे "(Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करणेत आलेला आहे.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. गोष्टीचा शनिवार शाळा बंद पण शिक्षण सुरु, स्वाध्याय तसेच शिक्षक सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम प्रशिक्षण online पद्धतीने घेण्यात येत आहेत. मुले घरीच online माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शाळा बंद व लॉकडाऊन मुळे शहरी भागात बहुतांश मुले ही घरातच बंदिस्त आहेत. खेळण्याच्या वयात मुले घरात बंदिस्त झाल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक समस्या मुलांमध्ये निर्माण होऊ शकतात. या बाबींचा विचार करून परिषेदेच्या सामाजिक शास्त्र व कला क्रीडा विभागामार्फत इ. १ ली ते ८ वीच्या वर्गात अध्यापन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने शिकू आनंदे (Learn with Fun)हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु करण्यात आलेला आहे.
प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळ असेल. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत. याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहचवावी व जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करा.
0 Comments