Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुलांसाठी किशोर गोष्टी video स्पर्धा.... Video पाठविण्यासाठी अंतिम मुदत 31 ऑगस्ट ... किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त किशोर मासिकाचा उपक्रम

किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त किशोरच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमात मुलांना सामावून घेण्यासाठी " मुलांच्या किशोर गोष्टी " ही स्पर्धा घेण्यात येत आहे.


किशोर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त किशोरच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यापैकी ‘किशोर गोष्टी’ हा मान्यवर लेखकांनी आपली गोष्ट सांगण्याचा उपक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. आता या उपक्रमात मुलांना सामावून घेण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ‘मुलांच्या किशोर गोष्टी’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे.  यात चौथी ते नववीचे विद्यार्थी त्यांना आवडलेली किशोर मासिकातील गोष्ट व्हिडीओ रुपात ध्वनीचित्रमुद्रीत करून पाठवतील. ही स्पर्धा ३ री ते ५ वी आणि ६ वी ते ९ वी अशा दोन गटात होईल. तज्ज्ञांची समिती हे व्हिडीओ पाहून त्यातून पहिला, दुसरा व तिसरा तसेच उत्तेजनार्थ क्रमांक निवडतील. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेच्या रूपात बक्षीस देण्यात येईल.  प्रथम बक्षिस रु. ५०००, द्वितीय बक्षीस ३,००० व तृतीय २००० व उत्तेजनार्थ रु. १००० अशी ती रक्कम आहे. विजेत्या विद्यार्थ्यांच्या गोष्टी  ई-बालभारतीच्या पुणे येथील स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करून त्या ई-बालभारतीच्या युट्युब चॅनलवरून प्रसारित होतील. तरी जास्तीतजास्त मुलांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

दिवसनिहाय सेतू अभ्यासक्रम PDF  इ. 2री ते इ. 10वी (45 दिवस) up to 14 Aug updated

Bridge Course  PDF for Std 2 - Std 10 

Bridge Course सेमी इंग्रजी PDF डाउनलोड करा. 

सेतू अभ्यासक्रम (bridge course) इयत्तानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

किशोर गोष्टी स्पर्धेचे नियम

१) ही स्पर्धा चौथी ते नववीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. 

२.1) विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या माध्यमातून आपली गोष्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवावी. 

2.2) video तयार करताना मोबाईल आडवा धरुन शूट करा. Horozantal mode

2.3) Video तयार करताना मागील बाजू (background) प्लेन किंवा एकाच रंगातील असावा. 

2.4) सूर्यप्रकाशाच्या / प्रकाशाच्या विरुद्ध बाजूने video शूट करा. म्हणजे क्लेअर येईल. 

३) ही स्पर्धा ३ री ते ५ वी आणि ६ वी ते ९ वी अशा दोन गटांत होईल

4) गोष्ट किशोर अंकातील असावी.

किशोर मासिक Android ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

5) सुरुवातीला विद्यार्थ्यांने आपले संपूर्ण नाव, वर्ग, शाळा व गोष्ट कोणत्या अंकातील आहे. याचा उल्लेख करावा. 

५) किशोरचे सर्व जुने अंक बालभारतीच्या www.kishor.ebalbharati.in या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहेत.

किशोर मासिकचे मागील सर्व अंक pdf  स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.  Click Here

६) गोष्ट ५ ते ७ मिनिटांची असावी.

७) विजेत्यांना पुढीलप्रमाणे बक्षीस देण्यात येईल. प्रथम बक्षीस रु. ५०००, द्वितीय बक्षीस ३,००० व तृतीय २००० व उत्तेजनार्थ रु. १०००.

८) व्हिडिओ पुढील ई-मेलवर पाठवावेत.

executive_editor_kishor@ebalbharati.in 

९) स्पर्धेची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२१ आहे.

१०) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

११) संपर्क क्रमांक: ०२०-२५७१६१४४

किशोर मासिक दिवाळी अंकासह 50 रुपयात वर्षभर मिळणार घरपोच. पहा कसे मागवावे? 





Post a Comment

0 Comments

close