Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'किशोर’ मासिक फक्त 50 रुपयांमध्ये वर्षभर मिळणार घरपोच... ते ही दिवाळी अंकासह..

किशोर मासिकाचे दिवाळी अंकासह वर्षभरातील सर्व अंक केवळ 50 रुपयांमध्ये घरपोच मिळणार आहेत.  आजच वार्षिक वर्गणी भरुन या संधीचा लाभ घ्या. 

किशोर मासिकाची सुरुवात १४ नोव्हेंबर १९७१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी करण्यात आली. किशोर’ हे मासिक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच (बालभारती) च्या वतीने सुरू करण्यात आले. हे मासिक ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांसाठी प्रकाशित केले जाते.  सन 2021 हे ‘किशोर’ मासिकाचे 50 वे वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोर मासिकाची वार्षिक वर्गणी दिवाळी अंकासह फक्त 50 रुपये ठेवण्यात आली आहे.


किशोर मासिकाची उद्दिष्टे 

  • ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी,
  • अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, 
  • त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टे ठेवून किशोर मासिक चालवले जाते. 

पहा - आता दर शनिवारी "किशोर गोष्टी". मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्टी

मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमा बाहेरचे ज्ञान मिळावे, मुलांच्या संवेदनशील मनावर उत्तम मुल्यांचे संस्कार व्हावेत हा या मासिकाचा उद्देश आहे. सदरचे मासिक हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. दिवाळी अंकासह वर्षभरातील सर्व अंक केवळ 50 रुपयांमध्ये घरपोच मिळणार आहेत. वाचन संस्कृती जपण्यासाठी व वृद्धिंगत करण्यासाठी, आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, मुलांमधील सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी हे मासिक अत्यंत उपयुक्त आहे.

किशोर सुवर्ण महोत्सवी चित्रकला स्पर्धेत भाग घेण्यासाठी व स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे टच करा

आपल्या मुलांना वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी, मुलांमधील सृजनशीलतेचा विकास करण्यासाठी या मासिकाची वार्षिक वर्गणी भरुन आजच एक प्रत मागवा.

वार्षिक वर्गणी भरण्यासाठी 

ऑनलाईन वर्गणी भरून सभासद होण्यासाठी पुढील लिंक ला टच करा. 

किशोर वेबसाईट - http://kishor.ebalbharati.in/Archive/

बालभारतीhttp://balbharati.in/


किशोर मासिक Android App 

किशोर मासिक चे Android App  डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here. 

तरी या संधीचा पालक, शिक्षक व वाचन प्रेमींनी लाभ घ्यावा. 

संपर्क करा. 
कार्यकारी संपादक (किशोर) व जनसंपर्क अधिकारी
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती'
सेनापती बापट मार्ग, पुणे - ४११ ००४
मोबाइल नं. ९४२३००५०८९
ई मेल. executive_editor_kishor@ebalbharati.in



Post a Comment

1 Comments

  1. उपक्रम चांगला वाटला. म्हणून मासिकासाठी वर्गणी ऑनलाईन भरली. पण अजून मासिक मिळाले नाही. कुणी फोनही उचलत नाही.

    ReplyDelete

close