कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घोषित केलेल्या कालावधीत दिव्यांग अधिकारी / कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सुट देण्याबाबत शासन निर्णय आज (३मे) घेण्यात आला आहे.
सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय कार्यालयांमध्ये रोटेशन पध्दतीने दैनंदिन उपस्थिती काही टक्क्यांच्या मर्यादेपर्यत ठेवण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने या अगोदरच निर्गमित केलेल्या आहेत. तसेच दिव्यांग अधिकारी/कर्मचारी यांच्या अनुपस्थितीची कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार नाही, याची संबंधीत आस्थापनांद्वारे दक्षता घेवून शासकीय कार्यालयात उपस्थित राहण्यापासुन त्यांना सुट देण्याबाबत या अगोदरच संदर्भाधीन क्र. १ येथील शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे. सद्यस्थितीत सदर परिपत्रक लागू राहिल किंवा कसे याबाबत विविध विभागांनी विचारणा केलेली आहे तसेच विविध संघटनांकडूनही त्यावरील अमंलबजावणी संदर्भात या विभागाकडे निवेदने पाठविली आहेत. हे विचारात घेवून सुधारीत परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
दिव्यांग कर्मचारी उपस्थिती बाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
शासन परिपत्रक :
सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय कार्यालयामध्ये रोटेशन पध्दतीने दैनंदिन उपस्थिती काही टक्क्यांच्या मर्यादेपर्यंत ठेवण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाने या अगोदरच निर्गमित केलेल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने अडचणींचा सामना करणे कष्टप्रद व त्रासदायक होत असल्याने सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सुट देण्यात यावी व त्यांना Work From Home ची मुभा देण्यात यावी. तथापि या सुटीमुळे कामकाजात अडचण येणार नाही याची दक्षता संबंधीत विभाग / आस्थापना घेतील. या मार्गदर्शक सूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत सर्व संबंधीत विभाग / आस्थापनांना लागू राहतील.
दिव्यांग कर्मचारी उपस्थिती बाबत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.



0 Comments