कोव्हिड १९ संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना रु ५०.०० लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्यास 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
वाचा - कोविड 19 संसर्गामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास विमा रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करणेबाबत...
कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यु होणा-या कर्मचा-यांना प्रत्येकी रु.५०.०० लक्ष सानुग्रह सहाय्य लागू करण्याचे आदेश दि.२९.०५.२०२० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. या शासन निर्णयानुसार सदर आदेश दि.३०.०९.२०२० पर्यंत लागू होते व त्यास 14 नोव्हेंबर च्या शासन निर्णयानुसार दि. ३१.१२.२०२० रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या मृत्युची प्रकरणे वित्त विभागाच्या सहमतीने विशेष बाब म्हणून निकाली काढली जात होती. मात्र महाराष्ट्र राज्यात सद्य:स्थितीत कोव्हिड १९ साथीची परिस्थिती विचारात घेता दि.२९.०५.२०२० च्या शासन निर्णयास दि. ३१.१२.२०२० नंतर मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्या अनुषंगाने शासनाने दि.२९.०५.२०२० च्या शासन निर्णयास दि.०१.०१.२०२१ पासून दि.३०.०६.२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
वाचा - 50 लक्ष सानुग्रह सहाय्य मिळण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यास लागणारी कागदपत्रे...



0 Comments