Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम.. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविणार उपक्रम.

#स्वातंत्र्यदिन२०२3 व #IndependenceDayIndia2023 या हॅशटॅग ने व्हिडिओ अपलोड करावेत. १५ ऑगस्ट २०२3 रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७6 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करणेबाबत शासनाने आज दि. १३ ऑगस्ट रोजी आदेश काढला आहे. 


स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे उद्देश

१) क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी. 

२) विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी. 

Telegram Channel  जॉईन करा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. यामध्ये पुढील उपक्रम गटनिहाय घ्यावेत. 

वृक्षारोपण, अंतर शालेय / अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता, चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वक्तृत्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन 

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमात कोणाला सहभागी होता येईल? 

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित गटनिहाय कार्यक्रमात सहभागी होतील.  

WhatsApp स्वाध्याय उपक्रम विभाग/जिल्हा निहाय लिंक

WhatsApp स्वाध्याय रिपोर्ट - जिल्हा व तालुका निहाय लिंक 

भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त गटनिहाय खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गट पहिला - इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी

कार्यक्रमाचे नाव - 

१) वक्तृत्व 

२) एकपात्री अभिनय (वेशभूषासह) 

३) राष्ट्रगाण (वेशभूषासह) 

४) चित्रकला

राष्ट्रगीत गायन करुन प्रमाणपत्र मिळवा. 

विषय - 

१. माझा प्रिय भारत देश 

२. मी तिरंगा बोलतोय 

३. माझ्या स्वप्नातील भारत 

४. भारतीय ध्वज / माझ्या शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रम

५. स्वातंत्र्य लढ्यातील एका थोर सेनानीची वेषभूषा 

६. स्वातंत्र्य लढ्यातील कविता

www.shaleyshikshan.in

तपशील -

वकृत्व आणि एकपात्री अभिनय (वेशभूषासह) दिलेल्या तीन पैकी कोणत्याही विषयावर २ मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.

राष्ट्रगाण पारंपरिक वेशभूषेसह राष्ट्रगीत सादरीकरणाचा व्हिडिओ अपलोड करणे. 

चित्रकला दिलेल्या क्रं.४ च्या विषयावर चित्र काढून रंगविलेल्या चित्राचा फोटो अपलोड करणे.

उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन२०२3 व #IndependenceDayIndia2023 या HASHTAG (#) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गट दुसरा- इयत्ता सहावी ते इयत्ता आठवी

कार्यक्रमाचे नाव - 

१) निबंध लेखन

२. वक्तृत्व 

३. स्वरचित कविता लेखन 

४. काव्यवाचन 

५. देशभक्तीपर गीतगायन

Telegram Channel  जॉईन करा.  

विषय - 

१. अहिंसा व स्वातंत्र्यलढा 

२. सन २०२५ मधील भारत

३. माझ्या नजरेतून माझा भारत 

४. भारतीय स्वातंत्र्य लढा

५. स्वातंत्र्य आणि लहान-थोरांचे बलिदान

६. स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधीचे योगदान

७. १५ ऑगस्ट १९४७

www.shaleyshikshan.in

तपशील -

निबंधलेखन दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर १००० शब्दांपर्यंत A4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो  हॅशटॅग सह अपलोड करावा.

वक्तृत्व दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.

Telegram Channel  जॉईन करा.  

स्वरचित कविता लेखन - A4 आकाराच्या कागदावर स्वरचित कविता लिहून त्याचा फोटो अपलोड करावा.

काव्यवाचन / देशभक तीपर गीतगायन - काव्यवाचन आणि देशभक्तीपर गीत गायनसाठी मराठी/ हिंदी भाषेतील काव्य / गीत म्हणून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करावा.

उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन२०२3 व #IndependenceDayIndia2023 या HASHTAG (#) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

गट तिसरा - इयत्ता नववी ते इयत्ता बारावी

कार्यक्रमाचे नाव -

१. निबंधलेखन

२. वक्तृत्व 

३. व्हिडिओनिर्मिती (Videography)

४. दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह

५. कथाकथन

६. रांगोळी


विषय - 

१. भारत एक महासत्ता

२. भारतीय म्हणून माझी जबाबदारी

३. माझ्या स्वातंत्र्य लढ्याचे Real Heroes

४. भारतीय स्वातंत्र्यलढा 

५. स्वातंत्र्य आणि आपली कर्तव्ये

६. चले जाव / भारत छोडो (Do or Die) चळवळ

७. ७५ वा स्वातंत्र्य दिन

Telegram Channel  जॉईन करा.  

तपशील - 

निबंधलेखन - दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर १००० शब्दांपर्यंत A4 आकाराच्या कागदावर निबंध लिहून त्याचा फोटो  हॅशटॅग सह अपलोड करावा.

वक्तृत्व - दिलेल्या चार पैकी कोणत्याही विषयावर भाषण करून त्याचा ०३ मिनिटांचा व्हिडिओ करून अपलोड करणे.

व्हिडिओनिर्मिती - दिलेल्या क्रं.३ किंवा ४ या विषयाशी संबंधित इंटरनेटवरील फोटोंचा वापर करून 03 मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करून अपलोड करावी. 

दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील निवडक प्रसंगाच्या फोटोचा कोलाज तयार करून त्याचा फोटो अपलोड करावा.

उपरोक्त प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. #स्वातंत्र्यदिन२०२3 व #IndependenceDayIndia2023 या HASHTAG (#) वर upload करावे. तसेच विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर इ. वर upload करावे. प्रत्येक गटात वर्गनिहाय उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवड केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

Post a Comment

0 Comments

close