Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कविता - नातं बहीण भावाचं... रक्षाबंधन निमित्ताने सुंदर रचना

रक्षाबंधन निमित्ताने खास कविता :- नातं बहीण भावाचं..!!

------------------------------

आजचा सण हा पवित्र राखीचा 

क्षण भावाबहिणीच्या आनंदाचा

नूसताच धागा नसतो हा सूताचा

बंध हा बहीण भावाच्या प्रेमाचा।।

http://bit.ly/read-more-poems

नाते निर्मळ मनाचे हे रक्षाबंधनाचे

आठवण काढी दिवस बालपणीचे 

बहीण मोठी असेल तर वाटे आई

हाक मारतांना शब्द गोडच ताई।।

http://bit.ly/read-more-poems

काटा जरी रूतला तिच्या भावाला

अश्रू वेड्या बहीणीच्या डोळ्याला

हसणं खेळणं लहानपणीचे ते क्षण

खूप छान वाटे जेव्हा करी औक्षणं।।

http://bit.ly/read-more-poems

किती छान आहे ना हे पवित्र बंधन

माया प्रेम आपूलकीचेच हे गोंदन

सुख दुख सांगाया बहीण हवी एक 

जीवनाचा मार्ग सांगी ती सदा नेक।।

http://bit.ly/read-more-poems

लग्न होवूनी जेव्हा ती जाते सासरी

फक्त आठवणी उरते तिच्या माघारी

बहीणीच्या प्रेमाचा आटत नाही झरा

दूरही असली तरी मन भावाच्या घरा ।। 

http://bit.ly/read-more-poems

ज्याला नाही बहीण त्याने जोडावी 

सख्खीच असावी रितच हि मोडावी

बहीणीची माया कूणालाच न येई 

आई नंतर जगात तीच खरी माई।।

 http://bit.ly/read-more-poems

देहाने कूठेही असो मन सदा माहेरी

कसा असेल भाऊ हेच तिच्या अंतरी

भाऊ मोठ्ठा व्हावा हिच तिची अपेक्षा

भावाने करू नये कधी तिची उपेक्षा।।

http://bit.ly/read-more-poems

दोघात कधी न येवो संपत्तीचा वाद

परमेश्वर चरणी आज घाला हि साद

बहीणीसाठी करावं सर्व काही अर्पन 

आशीर्वाद तिचा घ्या हेच खरं तर्पन।।

http://bit.ly/read-more-poems

       *धन्यवाद..........🌹🙏*

*लेखन रचना:- राम धोटे सावनेर जि नागपूर*

📞9767819346,7798096929 

Post a Comment

0 Comments

close