रक्षाबंधन निमित्ताने खास कविता वाचा "बहिणी ह्या अशाच असतात.....!!!!" 😘😘
हृदयाला झालेल्या जखमा लपवत, हसत असतात.
डोळ्यातले अश्रू पापण्यांच्या
कडांवर थोपवत असतात.
*बहिणी अश्याच असतात.*
माहेरी झालेला अपमान
काळजात लपवून ठेवतात.
माहेरचा सन्मान दिमाखात
जगाला सांगत सुटतात.
*बहिणी ह्या अश्याच असतात*
सासरी पंचपक्कवान खातात पण,
भावाच्या घरी वरणभात खाऊन तृप्तीचा ढेकर देतात.
*बहिणी अश्याच असतात.*
हजारोचा शालू.. साड्या
कपाटात धूळ खात पडलेल्या असतात
पण भाऊबीजेच्या साडीसाठी
भावावर रुसत असतात.
*बहिणी ह्या अश्याच असतात.*
भावाच्या घरी सासुरवाडीची वर्दळ
बघून नजरेआड करतात.
आपल्या वेळेलाच वहिनीला
कसं बाहेर जायचं असतं.
ह्या प्रश्नाचं उत्तरचं
शोधायचं टाळतात.
*बहिणी अश्याच असतात*
लग्नमांडव जरी भरला पाहुण्यांनी,
सगळ्यांशी बोलता बोलता
हळूच रस्त्याकडे नजर मारतात.
अजून भाऊ कसा आला नाही,
म्हणून अस्वस्थ होतात.
*बहिणी अश्याच असतात.*
भाऊ मंडपात आला की,
उत्साहात सळसळून जातात.
भावाने आणलेली
काकणाची साडी नेसून
मंडपभर मिरवत राहतात.
*बहिणी ह्या अश्याच असतात.*
माहेरच्या साडीसाठी
रुसणाऱ्या बहिणी
शेवटच्या प्रवासाला निघताना
भावाचीच साडी नेसतात
*बहिणी ह्या अश्याच असतात.*🙏
खुप छान आहे मन लाऊन जर वाचली तर डोळ्यातून चटकन पाणी येईल अशी सुंदर कविता🙏



0 Comments