शाळा कधी सुरु होणार. 01 डिसेंबरपासून राज्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
01 डिसेंबर पासून राज्यातील पहिली पासूनच्या शाळा सुरु करणेबाबत राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याबाबत चा शासन निर्णय जाहीर करण्यात येईल.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रातील पहिल्या टप्यात इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याबाबत सुधारित शासन निर्णय 7 जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता.
आता 10 ऑगस्ट च्या शासन निर्णयानुसार 5वी ते 12 वी पर्यंत चे वर्ग सुरु करणेबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयानुसार शहरी भागातील 8वी ते 12वी व ग्रामीण भागातील 5वी ते 12वी पर्यंत चे वर्ग सुरु करता येणार आहेत.
कोरोना मुक्त गावात शाळा सुरु करणे बाबतचा 7 जुलै व 10 ऑगस्ट चा शासन निर्णय डाउनलोड करा.
मार्गदर्शक SOP - शाळा सुरु करणे संदर्भात मार्गदर्शक SOP डाउनलोड करा. Click Here
24 सप्टेंबर च्या शासन निर्णयान्वये 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्यासंदर्भात अतिरिक्त मार्गदर्शक सूचना
त्यानुसार सध्या कोरोनामुक्त गावात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होतील. 1 ऑगस्ट रोजी ब्रेक द चेन अंतर्गत जारी केलेले नियम, राज्य सरकारला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार देतात. कोरोना महामारीमुळे राज्यात मार्च 2020 पासून शाळा बंद आहेत. आता शिक्षण विभागाने लवकरच शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पहिली बैठक झाली.
राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. पुढील आठवड्यात शिक्षण विभागाची बैठक आहे, त्यावर निर्णय घेतला जाईल. त्यावर चर्चा केली जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक, यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 80 % पालकांनी शाळा सुरु करणेबाबत मत व्यक्त केले होते.



2 Comments
Chal
ReplyDeleteChalu hoil pahije plzzzz😢
ReplyDelete